पत्रकार भवन गांजवे पेठ पुणे येथे पार पाडला पदवी प्रदान समारंभ.

जामखेड प्रतिनिधी
गांधी पीस ऑफ फाउंडेशन नेपाळ या संस्थेकडून दर वर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या होतकरु व्यक्तींना ही मानद डॉक्टरेट पदवी दिली जाते.2025 यावर्षी ची मानद पदवी ही प्रा. अमोल सुभाष गव्हाळे यांना पुणे (पत्रकार भवन येथे) सौ. आश्विनी सुनिल जाधव संस्थापिका अध्यक्षव्हायब्रेट रिस्पॉन्स, व्हायब्रेट सोशल फौंडेशन शहर समन्वयक अर्बन सेल.मा. श्री. नितीन धावणे-पाटील उपाध्यक्ष, मराठी चित्रपट असोसिएशन चित्रपट निर्माता प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग श्री. जितेन्द्र तुळशीराम दाते. Chairman – ARJ Group of Industry’s
या मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली

यावेळी शिवानी संतोष पवार,कोमल शिवाजी मुळे, अंजली अमोल गव्हाळे, दीक्षा माने, आरती जाधव, काजल बारवकर, आयरा गव्हाळे, ज्ञानेश्वरी काळदाते, यांच्यासह बहुसंख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अमोल गव्हाळे यांचे प्राथमिक शिक्षण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव ता. जामखेड, जिल्हा -अहिल्यानगर येथे झाले आहे जिद्द चिकाटी व अभ्यासात सातत्य ठेवत त्यांनी हे यश मिळविले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आदर्श ठेवला आहे जे की शहराप्रमाणे ग्रामीण भागात शिक्षण घेताना पाहिजे तेवढ्या सुविधा उपलब्ध नसतात तसेच फारसे मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे शिक्षणाकडे विद्यार्थी पाठ फिरवत व्यवसाय किंवा वडीलोपार्जित शेतीकडे वळतात परंतु या सर्व परिस्थितीवर मात करत प्रा. अमोल गव्हाळे यांनी ग्रामीण भागातुन जाऊन शहरात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे तसेच आपण ज्या परिस्थितीतुन आलो आहोत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन्यांचे काय प्रश्न आहेत याची जाण आसल्याने त्यांच्या शौक्षणिक आडचणी सोडवण्यासाठी प्रा गव्हाळे हे समाजातील गोर गरीब अनाथ विद्यार्थ्यांना शहरात मोफत व माफक दरात मार्गदर्शन करत आहेत

त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण जामखेड महाविद्यालय जामखेड येथे पुर्ण केले
तर व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी देखील पुणे येथून संपादन केली आहे.
ते पुम्बाज करियर अकॅडमी
चे संचालक आहेत. या कार्याचा गौरव म्हणून त्यांना यावर्षीची ही मानद पदवी प्रदान करण्यात आली त्याबद्दल त्यांचे राज्यस्तरावर गावपातळीवर तसेच मित्र परिवार यांच्यासह सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केले जात आहे
