जामखेड प्रतिनिधी
बकरी ईदच्या अनुषंगाने खर्डा येथे चेक पोस्टवर खर्डा पोलीसांना संशयास्पद पीकअप टेम्पो आढळला तपासणी अंती खर्डा पोलीसांना पाच जनावरे आढळली. कसलाही परवाना नसताना राजरोस पणे जामखेड वरून धाराशिव येथे कत्तलीसाठी जनावरे चालली होती. त्यांची सुटका करत तीन जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत बकरी ईद अनुषंगाने खर्डा टोल नाका येथे चेक पोस्टे लावण्यात आलेले आहे. सदर ठीकाणी वाहने चेक करत असताना जामखेड येथुन आलेली पिकअप टेम्पो क्रं. MH-44-9303 यामध्ये जामखेड येथुन धाराशिव येथे
1) 01 HF क्राँस जातीचा काळ्यारंगाचा बैल
2) 1 पांढर्या रंगाचा खिल्लार जातीचा बैल
3) 1 तांबड्या रंगाचा गीर जातीचा बैल
4) 1 तांबड्या रंगाचा गीर जातीचा बैल
5) 01 HF क्राँस जातीचा काळ्या रंगाचा बैल असे बळजबरीने भरून कत्तली करीता घेऊन जात आहेत अशी माहीती मिळाल्याने.
चेक पोस्ट वरती सदर गाडीची थांबुन यातील आरोपी.
1) अजमुद्दीन नईमुद्दीन काजी वय 38 वर्ष रा. गाजिपूरा धाराशिव ता.जि. धाराशिव
2) नवनाथ भुजंग पेठे व 38 वर्षे रा. गावसुत तालुका जिल्हा धाराशिव
३) इर्शाद पठाण राहणार धाराशिव यांना सदर जणावरांबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने व सदर चे जणावरे कत्तलीसाठी चालले आहेत असे समजल्याने सदर ची कारवाई करण्यात आली सदर कारवाईमध्ये एकुण 2,87,000=00 /- रूपये किंमतीचे 5 बैल व पिक अप गाडी जप्त करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग विवेकानंद वाखारे, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस हेड कॉन्टस्टेबल संभाजी शेंडे, पोलीस कॉन्टस्टेबल शशी म्हस्के, पोलीस कॉन्टस्टेबल अशोक बडे, पोलीस कॉन्टस्टेबल विष्णु आवारे, पोलीस कॉन्टस्टेबल बाळु खाडे, पोलीस कॉन्टस्टेबल वैजिनाथ मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.
पुढील तपास पोलीस हेड कॉन्टस्टेबल संभाजी शेंडे हे करत आहेत.
चौकट
शनिवारी जामखेडचा बाजार असतो परिसरात जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी विक्री होते. यातच कत्तलीसाठी गुरांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते व वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात.