संध्या सोनवणे यांनी आपल्या पक्षातील आपले स्थान काय आहे याचे आत्मपरीक्षण करावे : राजश्रीताई मोरे..
जामखेड प्रतिनिधी –
रोहित दादा पवार यांच्यावरती टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षात आपल काय स्थान याचे आत्मपरीक्षण करावे असा सल्ला राजश्रीताई मोरे यांनी संध्या सोनवणे यांना दिला आहे.
तुम्ही युवती प्रदेशाध्यक्ष आहात तरी सुद्धा युवती कार्याध्यक्ष निर्मलाताई नवले तुम्ही प्रदेशाध्यक्ष असूनही तुमचा फोटो एकाही बॅनरवर का टाकत नाहीत याचं आत्मपरीक्षण करा
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की कर्जत जामखेडचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार मा श्री रोहित दादा पवार यांच्यावर टीका करणाऱ्या संध्या सोनवणे यांना फक्त कार्यालयासमोर रस्ताच दिसला का ?शहरातील अनेक शासकीय इमारती दिसल्या नाहीत का ? आमदार रोहित पवार यांनी अनेक उल्लेखनीय कामे केलेली आहेत राहिला विषय जामखेडची बारामती करण्याचा तर जामखेड मध्ये पाच वर्षापूर्वी जी परिस्थीती होती त्यामधे अमुलाग्र बदल झालेला आहे फक्त तो दिसण्यासाठी तुम्हाला महायुतीचा चष्मा काढून ठेवावा लागेल, तुम्ही म्हणता पाच वर्षामध्ये काहीही कामे झाली नाही, ताई तालुक्यात जी काही विकास कामे झाली आहेत ती कामे माहीत होण्यासाठी तालुक्यातील गावागावांमध्ये जावं लागत आपण पुण्यात बसून जर गप्पा मारायला लागलात तर तुम्हाला सत्य परिस्थिती समजणार नाही, पाच वर्षामध्ये मतदारसंघाचा खराखुरा चेहरा मोहरा बदलण्याचे काम रोहित दादा पवार यांनी केला आहे, राहिलेले कामे येणाऱ्या काळात नक्कीच पूर्ण केली जातील हा विश्वास माझ्यासहित मतदारसंघातील जनतेला आहे त्यामुळे आपण आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी रोहित दादा पवार यांच्यावरती टीका करू नये अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल आसे टिकेल प्रतिउत्तर देताना राजश्रीताई मोरे महिला तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जामखेड तालुका तथा माजी सभापती पंचायत समिती जामखेड यांनी बोलताना सांगितले.