तर ऑलिम्पियाड परिक्षेत राज्यात चौथा क्रमांक पटकावला.

जामखेड प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बुद्धीमता विकासासाठी राज्यात मंथन लक्ष्यवेध तसेच ऑलिम्पियाड सारख्या परिक्षा फौंडेशनच्या वतीने घेण्यात येतात या परिक्षांमध्ये बुद्धीमता कौशल्य सामन्य ज्ञान यामध्ये गणित मराठी इंग्रजी व बुद्धीमता अशा विषणांवर आनुसरून प्रश्नपत्रिका सोडवून घेतली जाते

राज्यभरात एकाच दिवशी व एकाच वेळी या परिक्षा घेतल्या जातात यासाठी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परिक्षेसाठी बसतात आणि याच परिक्षेत जामखेड येथील स्वराज सोनवणे या विद्यार्थ्याने मंथन परिक्षेत १५० पैकी १५० तर लक्ष्यवेध परिक्षेत १५० पैकी १५० गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला तर

ऑलिम्पियाड या परिक्षेत २०० पैकी १९२ गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे
यासाठी त्याला सेंच्युरी सेमी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका मनिषा काळदाते, पवार मॅडम, साक्षी काळदाते मॅडम, आई सोनाली सोनवणे वडील किरण सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले गेल्या वर्षीही स्वराजने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बक्षीस पटकावले होते अभ्यासाबरोबरच स्वराज याचे वकृत्व ही प्रभावी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा, शिवगर्जना तसेच इतिहास संदर्भात भाषण यावर त्याचे चांगले प्रभुत्व व व्यासपीठ क्षमता आहे

त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे यामध्ये जामखेड शहरातील सेंच्युरी स्कुल तसेच
खर्डा येथील मदरतेरेसा स्कुल नातेवाईक मित्रमंडळीनी स्वराजचे कौतुक केले आहे
