जोरदार झालेल्या पावसामुळे डि. आर. टेलर्स दुकानाचे स्लॅबचे सिलींग कोसळले.

- Advertisement -spot_img

जामखेड शहरातील नगरपरिषद शाॅपींग सेंटरच्या गाळ्याचे स्लॅब सिलींग कोसळुन व्यावसायिकाचे झाले नुकसान.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तत्कालीन ग्रामपंचायतने व्यापाऱ्यांना व्यावसाय करण्यासाठी मोठे आसे चाळीस गाळ्यांचे व्यापारी संकुल बांधलेले आहे
तपनेश्वर रोडबाजुस वीस व भाजी बाजार सामोर वीस आसे गाळे आहेत याठिकाणी आनेक व्यापारी नगर परिषदेला भाडे भरून आपला व्यवसाय करत आहेत

भाजी बाजाराकडील वरच्या मजल्यावर दोन नंबर गाळ्यामध्ये डी. आर. टेलर्सचे संचालक गोरख लोखंडे हे टेलरिंगचा व्यवसाय करतात काल रात्री जामखेड शहरात जोरदार पाऊस पडला त्यामुळे या दुकानाचे स्लॅबचे सिलींग कोसळले या घटनेत दुकानातील शिलाई मशीन ग्राहकांचे कपडे याच बरोबर इतरही वस्तुंचे नुकसान झाले आहे

लोखंडे यांनी सदर घटनेची माहिती नगरपरिषदेला कळवली व संबधित विभागाचे इंजिनियर यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली
तरी घटनेत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मला मदत मिळावी अशी मागणी लोखंडे यांनी केली आहे

गाळ्याच्या स्लॅबबरोबरच जिन्ह्याचा स्लॅबही गळुन पडला आहे त्यामुळे तो जिन्हा धोकादायक बनला आहे त्यामुळे नगरपरिषदेने ताबडतोब याची पहाणी करून दुरूस्ती करावी अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा