दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी उद्धव देशमुख, उपाध्यक्षपदी दिलीप गुगळे तर सेक्रेटरीपदी अरुण चिंतामणी यांची निवड.

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीची निवडणूक ५ जून रोजी झाली होती.  सदर निवडणुकीत कार्यकारी मंडळाच्या ११ सदस्य निवडून आले होते.

सदर कार्यकारी मंडळाची सभा आज पार पडली सदर सभेमध्ये
अध्यक्षपदी उद्धव देशमुख, उपाध्यक्षपदी दिलीप गुगळे  सेक्रेटरीपदी अरुण चिंतामणी, सह सेक्रेटरीपदी डॉ.सुनिल कटारिया यांची तर खजिनदार पदी शरद देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था जामखेड व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, मूल्याधिष्ठित संस्कार आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.

संस्थेच्या पदाधिकारी निवडीनंतर संस्थेच्या वतीने सर्व नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष उद्धव देशमुख म्हणाले, माझी इच्छा नसताना सर्व कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी तुम्हीच अध्यक्ष व्हा असा आग्रह धरला त्यामुळे आज मी हे पद स्वीकारले आहे.

संचालकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
ही संस्था अनेक लोकांच्या त्यागातून उभा राहिलेली आहे. आज त्या सर्व संस्थापकांची मला आठवण येते.  त्यांच्याच ध्येय धोरणावर विश्वास ठेवून आपण यापुढे संस्थेचे कामकाज पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना सेक्रेटरी अरुण चिंतामणी यांनी संस्थेने गेल्या ७५ वर्षामध्ये केलेल्या कार्याचा व प्रगतीचा आढावा घेतला व सर्वांना सोबत घेऊन संस्थेची पुढील वाटचाल करण्याबाबत विश्वास व्यक्त केला.

उपाध्यक्ष दिलीप गुगळे यांनी नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून संस्थेचा शैक्षणिक वारसा अधिक बळकट होईल, तसेच नव्या उपक्रमांची भर घालून संस्था प्रगतीपथावर वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त केला.

खजिनदार शरद देशमुख यांनी शैक्षणिक क्षेत्रात गेली अनेक दशके अत्यंत विश्वासार्ह कार्य करत असलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी, जामखेड या प्रतिष्ठित संस्थेच्या कार्यकारी मंडळावर निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी संस्थेचा  नावलौकिक वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

यावेळी रामनाथ परदेशी, डॉ. प्रताप गायकवाड, दिपक होशिंग, शिवाजी कासार, दत्तात्रय वडे, दिलीप चौकटे आदी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
सहसेक्रेटरी सुनील कटारिया यांनी आभार मानले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा