जामखेड प्रतिनिधी
घराच्या समोर झोपलेल्या वृध्द महीलेस रात्रीच्या सुमारास चाकुचा धाक दाखवून व मारहाण करत चार अज्ञात चोरट्यांनी महीलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरुन नेले. या प्रकरणी चार अज्ञात चोरट्यांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील धानोरा येथे वृध्द फीर्यादी महीला सुशिल मोहन निंबाळकर वय 65 व त्यांचे पती हे शेतातील घरासमोर दि 15 जुन रोजी झोपले होते. यावेळी रात्री सव्वा दहा वाजता चार अज्ञात चोरटे त्या ठिकाणी आले व फीर्यादी महीला व पती यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एकाने चाकुचा धाक दाखवून वृध्द महीलेच्या अंगावरील सोन्याचे मणीमंगळसुत्र व कानातील सोन्याचे फुले असा एकुण 24 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला.
या घटनेनंतर परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जामखेड तालुक्यातील अनेक ग्रामिण भागात चोर्यांचे प्रमाण वाढत आहे हे वरील घटनेवरून दिसुन येत आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पगारे हे करत आहेत.