निलेशभाऊ गायवळ मित्र मंडळाच्या वतीने संस्कृती कोळेकर हीचा सत्कार

- Advertisement -spot_img

संस्कृतीने दहावीच्या परीक्षेत मिळवले शंभर टक्के गुण..

जामखेड प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत दहावीत शंभर टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन करणाऱ्या जामखेड येथील संस्कृती ज्ञानेश्वर कोळेकर चा सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, मनसेचे दादासाहेब सरनोबत, भरत जगदाळे, गणेश काळे, ऋषिकेश गायकवाड, ज्ञानेश्वर कोळेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावीच्या परीक्षेत संस्कृती ज्ञानेश्वर कोळेकर ही मूळची जामखेड येथील असून, ती उपक्रमशील प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर कोळेकर यांची कन्या आहे.

संस्कृती कोळेकर ही जामखेड येथिल रहिवासी आहे. ती आष्टी येथील वसुंधरा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. संस्कृती हिला हिंदी विषयात १०० पैकी १००, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी १०० पैकी १००, सोशल सायन्स १०० पैकी १००, तर मराठीत १०० पैकी ९०, इंग्लिशमध्ये १०० पैकी ९९, गणितात १०० पैकी ९९ गुण मिळाले आहेत. अशाप्रकारे तिने ४९८+२ असे गुण मिळवून संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा