डॉ. प्रल्हाद (हारी) जाधव यांचे आपघाती निधन,जामखेड खर्डा रस्त्यावर झाला अपघात..

- Advertisement -spot_img

डॉ. जाधव यांचा येत्या तेविस तारेखेला होणार होता विवाह..

जामखेड प्रतिनिधी
डॉ. प्रल्हाद जाधव (वय २४) रा. नाहुली हे आज दि. १६ रोजी जामखेड वरून औषधे घेऊन आपल्या गावी  चालले असताना खर्डा रोडवर कोल्हे पेट्रोल पंपाजवळ वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला पास करताना धडक होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले ताबडतोब जखमीस जामखेड येथे खाजगी दवाखाना दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

डॉ. जाधव हे दोन वर्षांपासून मुक्या प्राण्याची सेवा करत होते. दोन वर्षापासून ते व्हिटरनरी डॉ म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. जामखेड तालुक्यातील नाहुली येथील प्रल्हाद जाधव यांनी काही दिवस जामखेड शहरातील एका मेडिकल मध्ये काम करत होते. दोन वर्षांपूर्वी व्हिटरनरी कोर्स केला व व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात चांगला जम बसवला होता.

आज शुक्रवार दि. १६ रोजी सकाळी जामखेड येथून जनावरांची औषधे घेऊन आपल्या गावी चालले होते. खर्डा रोडवर कोल्हे पेट्रोल पंपाजवळ आपल्या मोटारसायकल वर चालले होते. समोर ट्रॅक्टर ला पास करताना ट्रॅक्टर वर धडक बसून रक्ताच्या थारोळ्यात पडले. आणि मृत्यू झाला.

डॉ. प्रल्हाद जाधव यांचे येत्या २३ रोजी लग्न होते घरात लग्नाची तयारी चालली होती. आणी नियतीने जाधव कुटुबियांवर अघात केला आहे.

डॉ जाधव यांच्या मागे आई वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे. पुढील घटनेचा तपास पोलीस नाईक संतोष कोपनर करत आहेत.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा