साकत घाटात ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जखमी..

- Advertisement -spot_img

साकत घाटात आपघाताची मालिका सुरूच..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड सौताडा महामार्गाच्या अपुर्ण कामामुळे व खराब रस्त्यामुळे वाहतूक साकत मार्गे ये जा करतात आज रविवारी दि. १८ रोजी सकाळी अंबड जि. जालना येथून मका भरलेला बारा टायर ट्रक पुण्याच्या दिशेने चालला होता. साकत घाटात वळणावर टर्न न बसल्याने ट्रक पलटी झाला यात एक जण जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.

आज सकाळी अंबड येथून मका भरलेला ट्रक साकत मार्गे जामखेड कडे चाललेला असताना घाटात वळणावर टर्न न बसल्याने ट्रक पलटी झाला यावेळी ड्रायव्हर व मदतनीस दोघांनी उड्या मारल्या यावेळी ड्रायव्हर जखमी झाला पण मदतनीस (किन्नर) यांने उडी मारली पण ट्रक त्याच्या अंगावर पडली यामुळे जाग्यावर मृत्यू झाला.

साकत वरून जामखेड चा चाललेले हरीभाऊ मुरूमकर, काका मुरूमकर यांच्या सह अनेक ग्रामस्थ गोळा झाले ताबडतोब सामाजिक कार्यकर्ते तसेच 108 रुग्णवाहिकेला फोन लावला यानंतर जवळील जेसीबी बोलावून ट्रक खालील मृत बाहेर काढला व जामखेड येथे दाखल केले.

साकत घाट अरूंद आहे. यामुळे अवजड वाहनांना टर्न बसत नाही. यामुळे नेहमीच अपघात होतात यामुळे ताबडतोब जामखेड साकत रस्ता व घाटाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे.

गेल्या दोन वर्षांत जवळपास दहा अपघात या घाटात झाले आहेत. त्यामुळे घाटाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे. अपघातातील मृत्यू झालेला व जखमी चे नाव समजू शकले नाही.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा