शिष्यवृत्ती परीक्षेत नागेश विद्यालयाचा दबदबा..

- Advertisement -spot_img

शिष्यवृत्ती परीक्षेत नागेश विद्यालयाचा दबदबा..

शहरी विभागातील १२ पैकी ८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक; यशाची हॅटट्रिक..

जामखेड, प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय, जामखेड येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये घवघवीत यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

शहरी विभागातील निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८ विद्यार्थी हे श्री नागेश विद्यालयाचे शिष्यवृत्तीधारक ठरले असून, सलग तिसऱ्या वर्षी मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत हॅटट्रिक साधली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा विद्यालयात उत्साहात पार पडला.

यावेळी उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य राजेंद्रजी कोठारी, हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत, स्कूल कमिटी सदस्य प्रकाश सदाफुले, कुंडल राळेभात, प्राचार्य बी. के. मडके, पर्यवेक्षक एस. व्ही. जाधवर, एनसीसी अधिकारी मयूर भोसले यांच्यासह शिक्षक, पालक व मान्यवर उपस्थित होते.

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
शंभूराजे केशवराज कोल्हे (२७२ गुण), संचित संतोष खैरे (२६० गुण), यश महादेव भोंडवे (२५४ गुण), यशराज शंकर भवर (२५४ गुण), आयुष अविनाश बोधले (२५२ गुण), अथर्व हर्षलकुमार पवार (२३८ गुण), सार्थक संदीप सानप (२३२ गुण) आणि यशराज शहादेव वराट (२३० गुण).
तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शिवकुमार केशवराज कोल्हे यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

‘गुणवत्तेचे दुसरे नाव म्हणजे नागेश विद्यालय’
विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा गौरव; आमदार रोहित पवार यांचे अभिनंदन
शिष्यवृत्ती यशामागील मार्गदर्शक शिक्षकांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. स्कॉलरशिप विभाग प्रमुख संतोष पवार, संभाजी देशमुख, अशोक चौधरी, निलेश अनारसे, संतोष ससाणे तसेच प्राचार्य बी. के. मडके यांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक करण्यात आले.

पालक प्रतिनिधी महादेव भोंडवे यांनी मनोगत व्यक्त करताना, “जामखेड तालुक्यातील शहरी विभागातील १२ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थी एकट्या नागेश विद्यालयाचे आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी असून रयतचे नागेश विद्यालय म्हणजेच गुणवत्ता हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे,” असे सांगितले.
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या या उज्ज्वल यशामुळे जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्रात श्री नागेश विद्यालयाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा