अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालय संघाचे पहिले अधिवेशन उत्साहात संपन्न.

- Advertisement -spot_img

ग्रंथालय ज्ञानमंदिरे होण्यासाठी त्यांना राजाश्रय मिळावा कवी चंद्रकांत पालवे..

अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालय संघाचे पहिले अधिवेशन उत्साहात संपन्न.

जामखेड प्रतिनिधी

अहिल्यानगर दिनांक 16 मार्च -देशाचे समाजाचे भविष्य उज्वल पणे घडवण्यासाठी त्यामधील जनमानसाला संस्कार व त्याची मानसिक जडणघडण देशप्रेम यांची आवश्यकता असते.ग्रंथालय आणि त्यामधील पुस्तके हे या सुदृढ समाज निर्मितीत महत्त्वपूर्ण घटक असून त्यांना खऱ्या अर्थाने शासन व दानशूर संस्था व्यक्ती यांच्याकडून राजाश्रय मिळण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन कवी चंद्रकांत पालवे यांनी व्यक्त केले.

अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालय संघाच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून कवि चंद्रकांत पालवे बोलत होते.अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी म.स.पा.चे जिल्हाप्रमुख जयंत येलुलकर उपस्थित होते यावेळी ग्रंथालय संघाचे अध्यक्ष पत्रकार सुरेंद्र शिंदे, संस्थापक सदाशिव शेळके,म स पा चे प्रकाशक जिल्हा प्रमुख गणेश भगत ,जिल्हा ग्रंथालयाचे संतोष कापसे ,कार्यवाह आजिनाथ  जायभाय,कोषाध्यक्ष विष्णुपंत पवार, भाऊसाहेब गवळी आदी उपस्थित होते.

अधिवेशनाचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी बोलताना “ग्रंथालय आणि त्यातील अमूल्य ग्रंथ हे समाजाचे श्वास आहेत .शहरांच्या भौतिक प्रगती बरोबर तेथील समाजाची सांस्कृतिक, मानसिक जडणघडण ही महत्त्वपूर्ण ठरते. त्यासाठी शासनाने ग्रंथालयांना त्यातील पुस्तके आणि उपक्रमासाठी  प्राधान्याने मदत करणे ही काळाची गरज आहे. वाचनालय व त्याचबरोबर वाचक समृद्ध होणे हे महत्त्वपूर्ण आहे. यासाठी जिल्हा ग्रंथालय संघाने वाचनालय व त्यामधील सेवक वर्ग ,ग्रंथपाल आणि परिसरातील सुजाण नागरिक यांना बरोबर घेऊन हा वाचन संस्कृतीचा वारसा वृद्धिंगत व समृद्ध करण्यासाठी घेतलेला ध्यास प्रेरक असल्याचे.सांगितले

ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुरेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविकात “जिल्हा ग्रंथालय संघ वाचनालयाच्या प्रगतीसाठी धडपडणारे कार्यकर्ते सेवक ग्रंथपाल यांना बरोबर घेऊन कार्य करीत आहे. वाचनालय समृद्ध होण्यासाठी अनेक मोठी आव्हाने आहेत. यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून वाचनालय व वाचक यांना केंद्रबिंदू मानून ग्रंथालय संघ सातत्याने जिद्दीने प्रयत्न करणारअसल्याचे सांगितले.तसेच जिल्ह्यातील मागेल त्या वाचनालयाला नियमाच्या अधिन राहुन संघाचे सभासदत्व दिले जाईल यावेळी त्यांनी अहिल्यानगर ग्रंथालय संघ पुढील टप्प्यात असणारी संघाची ध्येय धोरणे  याविषयी सविस्तर मनोगत व्यक्त केले.

संघाचे संस्थापक सदाशिव शेळके यांनी बोलताना संघाच्या तात्कालीन परिस्थितीत केलेला खडतर प्रवास व्यक्त केला. यापुढे ग्रंथालय संघ चळवळीनेअधिक जोमाने नाविन्यपूर्ण प्रयोग करून  वाचनाने समाजाला समृद्ध करणारा वारसा पुढे चालवावा. यासाठी आज होत असलेले अधिवेशन उज्वल भविष्याचा वेध घेणारे असल्याचे सांगितले.

या प्रसंगी मसपाचे गणेश भगत , एड आजिनाथ जगन्नाथ जायभाय ,  जिल्हा ग्रंथालयाचे संतोष कापसे, विष्णुपंत पवार यांनी मनोगते व्यक्त केले.उपस्थित मान्यवरांचा जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. अधिवेशनाच्या प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र चौकातील श्रीराम मंदिर येथून भारतीय राज्यघटनेच्या संविधान प्रतीची ग्रंथदिंडी काढण्यात आली.

अहिल्यानगर जिल्हा वाचनालयात आयोजित या जिल्हा अधिवेशनास जिल्हाभरातून असंख्य ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब गवळी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी ते साठी सहकार्यवहा नामदेव गरड, पनाजी कदम, भाऊसाहेब गवळी, जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल इथापे,पारसनाथ आहेर,बाळासाहेब शेलार ,शशिकांत झंजाड,राजेंद्र तरटे तसेच अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाचे कर्मचारी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. यावेळी जिल्ह्यातील ग्रंथालय चालक वाचक साहित्य प्रेमी उपस्थित होते

चौकट
आनंदाचा क्षण पाच वर्षाच्या परिश्रमाचे फलित.
पन्नास वर्षे जुना जिल्हा संघ मागिल अनेक वर्षे बंद होता पाच वर्षे मोठा संघर्ष करुन अहिल्यानगर जिल्हा संघ पुन्हा पुनर्जीवीत केला आहे आज या पुणनर्जीवीत संघाचे पहीले वार्षिक अधिवेशन यशस्वी पार पडल्याने पाच वर्षाच्या संघर्षाचे हे फलित झाले असुन जिल्ह्यातील ग्रंथालयाना आपली हक्काची मद संस्था मिळाली आहे .
एडवोकेट आजिनाथ जगन्नाथ जायभाय कार्यवाहक अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालय संघ

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा