स्वानंद सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर येथे चर्चासत्र उत्साहात संपन्न.
जामखेड प्रतिनिधी
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय कक्ष, महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख डॉ. श्री स्वानंद सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्रामध्ये विविध सामाजिक उपक्रम, गरजू नागरिकांना मदत करण्याच्या योजना तसेच मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक प्रभावीपणे मदत पोहोचविण्यासाठी समन्वय आणि सहकार्याची गरज यावरही भर देण्यात आला.

यावेळी जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार या उपस्थित होत्या. त्यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत शासनाच्या योजनांशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी सकारात्मक सूचना मांडल्या यावेळी त्यांच्या समवेत
जयेश कांबळे नवनाथ शिंदे तसेच अनेक समाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या चर्चासत्रामुळे सामाजिक संस्थांमध्ये समन्वय वाढून गरजू नागरिकांना अधिक वेगाने आणि परिणामकारकरीत्या मदत मिळण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



