आरोपीकडून 1 गावठी कट्टा व 1 जिवंत काडतुस हस्तगत.

- Advertisement -spot_img

सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आरोपीकडून 1 गावठी कट्टा व 1 जिवंत काडतुस हस्तगत.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील सागर मोहोळकर यांच्यावर गोळीबार करणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड तालुक्यातील झिक्री या गावातून जेरबंद केला आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा जिवंत काडतूसे असा एकूण ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आला. या प्रकरणी एकुण चार जणांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक हकीगत अशी की, दिनांक 04 मार्च 2026 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या चे सुमारास जामखेड शहरातील तपनेश्वर रोड ते खाडेनगरकडे जाणार्‍या रोडवरील नुराणी कॉलनी या ठिकाणी अज्ञात आरोपींनी मोटारसायकलवर येवुन पैलवान सागर किसन मोहळकर याचेवर गावठी कट्टयातुन गोळीबार करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटनेबाबत सागराचे वडील किसन चांगदेव मोहळकर रा. जांबवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द जामखेड पोलीस स्टेशनला गु.र.नं. 122/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 (1), सह आर्म ऍ़क्ट 3/25, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करित असताना पैलवान सागर मोहळकर याचे यापुर्वीचे कोणीशी वैमन्यस्य होते का ही आरोपींची माहिती काढत असतांना सदरचा गुन्हा हा अभिमन्यु पोते रा. जामखेड व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याचे समजले. तसेच सदरचा आरोपी हा झिक्री, ता. जामखेड गावच्या शिवारामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस पथकाने तात्काळ झिक्री गावच्या शिवारात जावुन अभिमन्यु महादेव पोते वय 24 वर्षे, रा. भुतवडा रोड, लाईट बोर्ड शेजारी, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, पुर्ण नांव माहित नाही, रा. कोथरुड, पुणे (फरार), रोहित विठ्ठल आखाडे रा. कोथरुड पुणे (फरार), चिन्या पुर्ण नांव माहित नाही, रा. कोथरुड पुणे (फरार), यांनी केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

वरील आरोपी हे मागील वादाच्या कारणावरुन सागर मोहळकर यास जिवे ठार मारण्यासाठी जामखेड या ठिकाणी आले होते. दिनांक 04 मार्च 2026 रोजी पैलवान सागर मोहळकर याचे हालचालीची माहिती जेरबंद केलेल्या अभिमन्यु पोते याने वरील इसमांना दिली होती. त्यानंतर त्यांनी त्यांचेकडील गावठी कट्टयातुन सागर मोहळकर यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचेवर फायरिंग केली असल्याची कबुली दिली आहे.

ताब्यातील आरोपी अभिमन्यु महादेव पोते याचेकडुन गुन्ह्यामध्ये फायरिंगकरीता वापरलेला 35 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा (अग्निशस्त्र) व एक चाळीस हजार रुपयांचे जिवंत काडतुस, गुन्ह्यामध्ये वापरलेली विना नंबरची ज्युपीटर मोटारसायकल व मोबाईल असा एकुण 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई अहिल्यानगर चे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक, वैभव कलुबर्मे अहिल्यानगर, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, अतुल लोटके, विष्णु भागवत, गणेश लोंढे, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, योगेश कर्डीले, अमृत आढाव, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, भगवान धुळे यांच्या पथकाने केली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा