उष्णतेचा पारा चढला तापमान ४० अंशांच्यावर..

- Advertisement -spot_img

उष्णतेचा पारा चढला तापमान ४० अंशांच्यावर..

मधुन मधुन ढगाळ वातावरणामुळे आणखीनच उकाडा वाढत आहे

जामखेड प्रतिनिधी

शहरासह राज्यभरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

सकाळपासूनच कडक उन्हाची झळ बसत असल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवरची वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून दुपारी उष्णतेचा पारा ४० अंशांच्या जवळ पोहोचत आहे. उष्ण व कोरड्या वाऱ्यामुळे नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हाचा फटका बसत असून डोकेदुखी, थकवा आणि उष्माघाताचा धोका वाढला आहे.

उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे तसेच हलके व सैल कपडे वापरावेत, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच फळांचे रस, ताक, नारळपाणी यांसारख्या द्रवपदार्थांचे सेवन वाढवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा