कांद्याने केला बळीराजाचा वांदा…
भाव गडगडल्याने उत्पादन खर्चही मिळेना..
सरकारच्या धोरणामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका..
जामखेड प्रतिनिधी
गेली महिनाभरापासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली पहावयास मिळत आहे त्यामुळे मोठ्या खर्चाने उत्पादित केलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे

लाल कांद्याची लागवड या हंगामात मोठ्या प्रमाणावर झाली होती बियाणे खते व औषधे यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या त्यातच यावर्षी मोठ्या प्रमाणावर आतिवृष्टी सदृश्य पावसामुळे बरीच कांद्याची लागवड वाया गेली उरला उरलेल्या कांद्याला वातावरणातील बदलामुळे नेहमीच किड रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यासाठी महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागल्या..

त्यामुळेच मोठा खर्च करुन उत्पादित केलेल्या कांद्याला चांगला दर मिळेल या भाबड्या आशेवर शेतकरी राहिला परंतु सरकारने ऐन कांदा मार्केटेला येण्याच्या वेळी निर्यात धोरण बदलले त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून 3000 ते 3500 रु
आसलेला दर आज 1000 ते 1500 रू खाली आल्याने कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चही निघेना आशी भावना शेतकऱ्यांनी व्यक केली आहे

त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन सरकारने तातडीने पावल उचलावीत व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा आशी आपेक्षा शेतकरी करत आहेत..


