क्रांतीसुर्य महात्मा फुले हे नवयुगाचे निर्माते, त्यांनी स्त्री शिक्षणाची दारे खुली केली :नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी.

- Advertisement -spot_img

जामखेड नगरपरिषदेकडून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी.

महात्मा फुले हे नवयुगाचे निर्माते, त्यांनी स्त्री शिक्षणाची दारे खुली केली :नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषदेच्या वतीने शहरातील खर्डा चौक येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे करण्याचा ठराव नगरपरिषदेने घेतला असून, त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर आबा राळेभात, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले की, महात्मा ज्योतिराव फुले हे नवयुगाचे निर्माते होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून पुण्यात १ जानेवारी १८४८ रोजी भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्या या कार्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात प्रगती करत असून, याचे श्रेय महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जाते.

तसेच समाजात समानता प्रस्थापित व्हावी, माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे, यासाठी त्यांनी मोठ्या धैर्याने कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत जामखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. मधुकर आबा राळेभात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी गोरगरीब, शोषित आणि पीडितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि अपमान सहन करूनही सामान्यांच्या उन्नतीसाठी कार्य सुरू ठेवले.

या कार्यक्रमाला प्रा. मधुकर आबा राळेभात, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, अमित चिंतामणी, तात्याराम पोकळे, विकी घायतडक, मोहन पवार, प्रविण सानप,संजय काशिद श्रीराम डोके, नंदाताई होळकर, प्रविण चोरडीया,पवन राळेभात, गणेश डोंगरे, हर्षद काळे, मनोज कुलकर्णी, अश्रू शेळके, अर्जुन म्हेत्रे, संतोष गव्हाळे, सागर टकले, प्रविण होळकर, अमोल गिरमे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा