खर्डा चौकातील वाहतूकीला कधी लागणार शिस्त,वाहातुक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष..

- Advertisement -spot_img

जामखेड शहरातील खर्डा चौक येथे वारंवार वाहतूक कोंडी..

खर्डा चौकातील वाहतूकीला कधी लागणार शिस्त,वाहातुक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष..

जामखेड प्रतिनिधी

मराठवाड्याचे प्रवेशद्वार आसणाऱ्या जामखेड शहरातुन राष्ट्रीय व राज्य महामार्ग जातात हे महामार्ग जामखेड शहरातील खर्डा चौकत एकत्र येतात परंतु या चौकात नेहमीच वाहातुक कोंडीची समस्या उध्दभवत आसल्याने नागरीकांनी नाराजी केली आहे

या कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांग लागत असून वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला आहे.

ही कोंडी सोडवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे परंतु तसे होताना दिसत नाही वाहातुक कोंडीची बरेच कारणे आसले तरी पण पोलीस प्रशासनाने ती सुरळीत करुन खर्डा चौकातील वाहतूकीला शिस्त लावावी आशी मागणी जामखेडकर करत आहेत.

या कोंडीमागे रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम हे एक प्रमुख कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच चौक परिसरातील दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर मोटारसायकली व इतर वाहने उभी केली जात असल्याने रस्ता अधिकच अरुंद होत आहे. परिणामी वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.
याकडे ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

चौकात नियमितपणे पोलीस तैनात नसल्याने वाहतूक नियंत्रणाचा अभाव जाणवत आहे. काही वेळा वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असल्याने रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे.या समस्येवर तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी जामखेडकरांकडून होत आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा