जामखेड शहरात गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा इतिहास स्क्रीन द्वारे दाखवण्यात येणार..
गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहीदी दिना निमित्त आयोजन..
जामखेड प्रतिनिधी
हिंद दि चादर मानवता साहस और धर्म रक्षक के साक्षात प्रतीक गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहीदी दिना निमित्त
जामखेड या ठिकाणी एलईडी स्क्रीन द्वारे त्यांचा इतिहास दाखवण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन जामखेड मधील सिख समाज बांधव आणि मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आला आहे.

श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल 1621 नोव्हेंबर 1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरू तेग बहादुर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ या नावाने गौरविले जात. धर्म, मानवता, आदर्श आणि तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांमध्ये गुरु तेग बहादुर यांचे स्थान जागतिक इतिहासात अद्वितीय आहे. श्री गुरु तेग बहादुर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात. त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी गुरू तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागमा निमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभाग व श्री गुरूतेग बहादुर साहिबजी 350 शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

याच अनुषंगाने धर्मासाठी आणि मानवतेसाठी त्यांनी जे बलिदान दिले आणि त्यांचा पूर्ण इतिहास यावेळी जामखेड शहरात स्क्रीन द्वारे दाखवण्यात येणार आहे. तरी जामखेड पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती करण्यात आली आहे. बुधवार दि 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत जामखेड शहरातील जुने पोलीस स्टेशन प्रांगण पोलीस स्टेशन रोड या ठिकाणी दाखविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन जामखेड मधील सिख समाज बांधव आणि मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आला आहे.



