“गोदा ते नर्मदा जनजागृती यात्रा” चौंडीत नियोजन बैठकीचे आयोजन

- Advertisement -spot_img

“गोदा ते नर्मदा जनजागृती यात्रा” चौंडीत नियोजन बैठकीचे आयोजन

सभापती प्रा.राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती.

जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्ममहोत्सव वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर “गोदा ते नर्मदा जनजागृती यात्रा” या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या नियोजनासाठी चोंडी येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही नियोजन बैठक मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, चोंडी (ता. जामखेड) येथे पार पडणार आहे. या बैठकीस राज्याचे सन्माननीय सभापती प्रा. राम शिंदे तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

“गोदा ते नर्मदा जनजागृती यात्रा” हा उपक्रम जलसंवर्धन, पाणी व्यवस्थापन आणि सामाजिक जागरूकता यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, यामध्ये विविध स्तरांवरील नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.

यात्रेच्या माध्यमातून जलसंपदा जतन, पाण्याचा योग्य वापर आणि पर्यावरण संवर्धन याबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, यात्रेचे नियोजन, मार्गक्रमण, स्थानिक सहभाग आणि विविध कार्यक्रमांची आखणी यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

तरी सर्व संबंधित कार्यकर्ते, नागरिक व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बैठकीस यशस्वी करावे,असे आवाहनआयोजकांकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा