चिमुकला आरमान पठाण याचे एक महिन्याचे उपवास पुर्ण.

- Advertisement -spot_img

दहा वर्षांच्या चिमुकला आरमान पठाण याचे एक महिन्याचे उपवास पुर्ण

जामखेड प्रतिनिधी

जामखेड – रमजान महिना हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असतो या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव एक महिन्याचे निरंकार उपवास करतात .

इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिना 19 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून त्याची सांगता २१ मार्च रोजी रमजान ईद म्हणून सर्व मुस्लीम बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली . जगभरातील मुस्लिम बांधव या महिन्यात आत्मशुद्धी, संयम आणि भक्तीचा संदेश देत आहेत. नमाज, रोजा आणि जकात यांचे काटेकोर पालन करत हा महिना अध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पित केला जातो. या पवित्र वातावरणात अहिल्यानगर शहरात एक प्रेरणादायी प्रसंग घडला आहे.

अहिल्यानगरच्या मुकुंदनगर येथील फौजी हाफीजखान हमजेखान पठाण यांचा मुलगा आरमान पठाण याने अवघ्या दहाव्या वर्षी त्याने एक महिन्याचे (उपवास) रोजा पूर्ण करून भक्ती आणि संस्कारांचा सुंदर आदर्श घालून दिला. एवढ्या लहान वयात दाखवलेली जिद्द आणि श्रद्धा पाहून कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनीही त्याचे कौतुक केले.

रमजान हा इस्लामिक कालगणनेतील नववा महिना असून या महिन्यात कुराण शरीफ अवतरल्याची मान्यता आहे. रोजा म्हणजे केवळ अन्न-पाणी त्याग नव्हे, तर वाईट विचारांपासून दूर राहून संयम, करुणा आणि आत्मपरीक्षणाचा मार्ग स्वीकारणे होय. गरीब व गरजूंची मदत करण्यासाठी जकात देणे ही देखील या महिन्याची महत्त्वाची शिकवण आहे. लहान मुलांना रोजा आणि त्यामागील संस्कार समजावून देण्यासाठी अनेक कुटुंबांमध्ये रोजा विशेष उत्साहात साजरा केला जातो.

दिनांक 20 मार्च रोजी कडक उन्हाची चाहूल असतानाही चिमुकल्या हाफीज पठाणने कोणतीही तक्रार न करता उत्साहाने आपले एक महिन्याचे (उपवास) रोजे पूर्ण केले. इतक्या लहान वयात त्याने दाखवलेली चिकाटी आणि भक्ती पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले. आनंदमय वातावरणात रमजान ईदच्या दिवशी आरमान पठाण याचा सत्कार करण्यात आला. एवढ्या लहान वयात एक महिन्याचे ( उपवास ) रोजे पूर्ण केल्याबद्दल पठाण कुटुंबाचे सर्वत्र अभिनंदन होत असून उपस्थित मान्यवरांनी आरमान पठाण याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा