चोंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत,जामखेडच्या प्रश्नांवर आकाश बाफना यांचे निवेदन
जामखेड प्रतिनिधी
चोंडी (ता. जामखेड) येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या आगमनावेळी शिवसेना युवा नेते आकाशशेठ बाफना यांनी उत्साहपूर्ण स्वागत केले.
या वेळी स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीदरम्यान आकाश बाफना यांनी जामखेड शहरातील विविध प्रलंबित समस्यांबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांना सविस्तर निवेदन सादर केले. शहरातील तीव्र पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित अडचणी यामध्ये अधोरेखित करण्यात आल्या. या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्यांचे निराकरण करावे, अशी मागणी करण्यात आली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी तालुकाप्रमुख कैलास माने, शहरप्रमुख मोहनजी देवकाते, ज्येष्ठ नेते कैलास अण्णा जाधव, उपजिल्हाप्रमुख तात्या वाळुंजकर, जिल्हा ओबीसी अध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीमुळे जामखेड शहरातील प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



