छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची प्रेरणा पुढच्या पिढीला मिळावी यासाठी स्मारक गरजेचे :रोहिणीताई काशिद..

- Advertisement -spot_img

महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपतींच्या स्मारकासाठी जामखेड नगरपरिषदेला दिले निवेदन..

जामखेड प्रतिनिधी
राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या औचित्याने महिला शिवजन्मोत्सव समिती व शिवप्रेमींच्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौक येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे या मागणीसाठी आज रोजी जामखेड नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य,त्याग,साहस,पराक्रम,दुरदृष्टी,
नेतृत्व,न्यायप्रियता,राष्ट्रभक्ती,आदि स्वराज्याच्या संकल्पनेला आभिवादन करणे व भावी पिढ्यांना त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी जामखेड शहरातील मध्यवर्ती ठिकाण व चार जिल्ह्यांच्या दळण वळणसाठी आसणारा शहरातील खर्डा चौक येथे छत्रपतींचे भव्य स्मारक व्हावे आशा आशयाचे निवेदन महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने जामखेड नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी संभाजी कोकाटे यांना देण्यात आले

यावेळी बोलताना महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशीद म्हणाल्या की आज राजमाता जिजाऊंची जयंती आहे त्यांनी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे रत्न दिले तसेच जिजाऊ मातेमुळेच आज महिलांना समाजामध्ये मान सन्मानाने रहाता येत आहे आशा महान जननीस जयंती निमित्त आम्ही भगिनी आभिवादन करतो आणि या पवित्र दिवशी राजांच्या स्मारकासाठी आम्ही निवेदन दिले आहे त्याची दखल घेऊन नगरपरिषद नक्कीच भव्य दिव्य स्मारक उभारेल आशी आपेक्षा व्यक करते आसे सांगितले

यावेळी सरोळा गावच्या सरपंच रितुताई काशीद,वैशाली शिंदे,कांचन दहीतोडे,सुरेखा आम्ले,उज्ज्वला खेत्रे,रेणुका टेकाळे रामकवर कोल्हे शिवाणी कोल्हे सोनाली मांडावे प्रणाली कुलकर्णी सृष्टी काळे आरती काळे तनुजा वीर सिमा सोनार सविता काळे आदिती उबाळे राधा उबाळे गौरी जंगम स्वाती जंगम शिवानी पाटील आदिती काशीद पुनम हावले रेश्मा अवसरे सुरेखा गंडाळ विद्या भोसले मंगल निमोणकर स्वाती झगडे वैशाली झगडे सोनिया पाटील भारती फरांडे सारिका जाधव यांच्यासह मोठय़ा संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा