जनविकास सेवा संस्थेच्या वतीने उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा सन्मान.

- Advertisement -spot_img


जामखेड प्रतिनिधी
जनविकास सेवा संस्था जामखेड यांच्या वतीने उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात तसेच स्वीकृत नगरसेवक पवन राजे राळेभात, प्रवीण चोरडिया व गणेश डोंगरे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

जनविकास सेवा संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व रामभाऊ पवार यांच्या वतीने मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी बोलताना लक्ष्मीताई पवार यांनी जनविकास सेवा संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी विकासकामे, सामाजिक उपक्रम व लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका मांडली.

सत्कार समारंभास नगरसेवक हर्षद काळे, विजू कुलकर्णी, करण काळे, प्रकाश सदाफुले, रुकसाना भाभी शेख यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा