जातेगाव-महारुळीत शिवसेनेचा विस्तार; नव्या शाखांचे उद्घाटन उत्साहात
‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ अभियानाला प्रतिसाद; संघटना बळकटीसाठी लवकरच शिवसैनिकांचा मेळावा
जामखेड प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आणि पक्ष सचिव रामजी रेपाळे तसेच पक्ष सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील जातेगाव व महारुळी येथे शिवसेनेच्या नव्या शाखांचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले आणि युवा नेते आकाश बाफना यांच्या हस्ते शाखांचे उद्घाटन करण्यात आले.जामखेड तालुक्यातील युवकांचा वाढता कल शिवसेनेकडे असल्याने पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ हे अभियान राबविण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उद्घाटन कार्यक्रमास ज्येष्ठ नेते कैलास जाधव, तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, शहरप्रमुख मोहन देवकाते, शहर उपप्रमुख किरण मराळ, खर्डा गटाचे नेते श्याम गोलेकर, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, जवळा कक्षप्रमुख कुलदीप पवार, विकी पिंपळे यांच्यासह शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांनी शिवसेनेची विचारधारा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. शिवसेना ही सर्वसामान्य जनतेची पक्षसंघटना असून पक्षाची विचारधारा आणि विकासकामे घराघरांत पोहोचविण्यासाठी गावागावांत शाखा विस्तार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जवळा गटात तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण समाजकार्यातून शिवसेनेची मजबूत ताकद निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच खर्डा गटात ज्येष्ठ शिवसैनिक व माजी पंचायत समिती सदस्य कैलास अण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली संघटन मजबुतीवर विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्य पाहता आगामी काळात जामखेड तालुक्यात शिवसेनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर तालुका शिवसेनेच्या वतीने उपस्थित ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

युवा नेते आकाश बाफना म्हणाले की, जामखेड तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तसेच संघटना अधिक मजबूत करण्यासाठी लवकरच तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असून सर्वांच्या सहकार्याने पक्षाला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न केले जातील.

जातेगाव शाखेची पदाधिकारी निवड
शिवसेना शाखाप्रमुखपदी किरण गायकवाड, युवासेना शाखाप्रमुखपदी महादेव गायकवाड, शिवसेना उपशाखाप्रमुखपदी नंदकुमार गायकवाड तर युवासेना उपशाखाप्रमुखपदी अजय गायकवाड यांची निवड करण्यात आली.
शाखेच्या सदस्यांमध्ये किरण गायकवाड, अजय गायकवाड, शंकर गायकवाड, बालाजी गायकवाड, नितीन गायकवाड, अशोक गायकवाड, कृष्णा गायकवाड, शहाजी गायकवाड, काका गायकवाड, राजेश गायकवाड, नंदकुमार गायकवाड, महादेव गायकवाड, नवनाथ गायकवाड, अक्षय गायकवाड, गोरख गायकवाड, हरिदास गायकवाड, बाळू गर्जे, रवी गायकवाड, विष्णू गायकवाड, संतोष गायकवाड आणि शेषेराव गायकवाड यांचा समावेश आहे.
महारुळी शाखेची पदाधिकारी निवड
महारुळी शाखेच्या शिवसेना शाखाप्रमुखपदी सुनील ढेपे, युवासेना शाखाप्रमुखपदी उद्धव मोहोळकर, शिवसेना उपशाखाप्रमुखपदी सावता ढेपे तर युवासेना उपशाखाप्रमुखपदी अशोक मुळे यांची निवड करण्यात आली.
शाखेच्या सदस्यांमध्ये गौतम ढेपे, शहाजी मोहोळकर, दादा मुळे, रोहिदास मुळे, विकास जगदाळे, शरद ढेपे, दादा ढेपे, काकासाहेब ढेपे, गीताश थोरात, महादेव नजन, आप्पा मुळे, बाबुराव ढेपे, दादा येवले, अनिल ढेपे, निलेश मुळे, हौसराव ढेपे, सतीश ढेपे, सौरभ मोहोळकर, भरत मोहोळकर, भाऊसाहेब मुळे, लक्ष्मण ढेपे, धनंजय मुळे आणि अनिकेत मुळे यांचा समावेश आहे.


