जामखेड नगरपरिषद हद्दीतील सर्व विकासकामे दर्जेदार पध्दतीनेच करून घेणार – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

- Advertisement -spot_img

जामखेड नगरपरिषद हद्दीतील सर्व विकासकामे दर्जेदार पध्दतीनेच करून घेणार – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

प्रशासनाला देखील विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत या बाबत सक्त सूचना…

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग व अंडरग्राउंड गटार योजनेच्या कामांबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात कोणताही ठेकेदार निकृष्ट, नियमबाह्य किंवा बोगस दर्जाचे काम करत असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

त्या म्हणाल्या, नागरिकांच्या करातून उभारल्या जाणाऱ्या विकासकामांमध्ये दर्जाबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही.संबंधित कामांची सखोल तपासणी करण्यात येत असून,दोषी आढळल्यास ठेकेदारावर कठोर कारवाई केली जाईल.तसेच कामांची गुणवत्ता नागरिकांसमोर पारदर्शक पद्धतीने तपासली जाईल,असेही त्यांनी सांगितले.नगरपरिषद प्रशासन कामांवर बारकाईने लक्ष ठेवून असून,नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात आहेत.

विकासकामे नियमानुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्षा चिंतामणी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा