जामखेड नगर रस्त्यावर शिवसेना युवा नेते अकाश बाफनांच्या गाडीला अपघात..
राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षेचा अभाव;अपघातांना आमंत्रण
जामखेड प्रतिनिधी
नगर–जामखेड राष्ट्रीय महामार्गावर एकदा बेफाम वेगामुळे अपघाताची घटना घडली. जामखेडचे युवा उद्योजक व शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना हे आपल्या चारचाकी इलेक्ट्रिक एम.जी. विंडसर गाडीतून भाच्यासह जामखेडकडे येत असताना बाफना पेट्रोल पंपाजवळ टर्न घेताना भरधाव स्कॉर्पीओने जोरदार धडक दिली. या अपघातात बाफना किरकोळ जखमी झाले.

धडक इतकी जबर होती की,या गाडीची एक बाजू पुर्ण चेपली गेली सुदैवाने गाडीतील एअरबॅग्स तात्काळ उघडल्याने अकाश बाफना सुखरूप बाहेर पडले
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत बाफना आणि त्यांच्या भाच्याला गाडीतून बाहेर काढले. मात्र धडक देणारी स्कॉर्पीओ गाडी चालकासह भरधाव वेगाने पसार झाली.

या घटनेबाबत आकाश बाफना यांनी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते नगरहून जामखेडकडे येत असताना स्कॉर्पीओ (एम एच-12-एक्स एक्स-8282) या वाहनाने बेदरकारपणे गाडी चालवत त्यांच्या कारला ड्रायव्हर साईडने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या कंबरेला व उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

या अपघाताने पुन्हा एकदा नगर–जामखेड महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिमेंट रस्ता झाल्यानंतर वाहनांचा वेग प्रचंड वाढला असून गतीरोधक, दिशादर्शक फलक आणि रेडियम पट्ट्यांचा पूर्ण अभाव असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.अपघातानंतर भावनिक स्वरात प्रतिक्रिया देताना आकाश बाफना म्हणाले,आज आम्ही सुदैवाने वाचलो; पण उद्या कुणाचा जीव जाईल सांगता येत नाही. प्रशासनाने तात्काळ गतीरोधक, फलक आणि रेडियम बसवून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा.असे यावेळी बोलताना आकाश बाफना यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित स्कॉर्पीओ चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी कदम तपास करत आहेत.

चौकट
यापुढे शहरातील रस्त्यांवर अपघात टाळण्यासाठी गतिरोधक, दिशादर्शक फलक, रेडियम, वाहन सुरक्षिततेच्या उपाययोजनेसाठी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग येथे पाठपुरावा करून निवेदनाद्वारे मागणी करणार, जेणेकरून आगामी काळात जामखेड शहरात अपघात होणार नाही, याकरिता पाठपुरावा घेऊन काम मार्गी लावणार.
आकाश दिलीप बाफना
युवा नेते, शिवसेना, जामखेड


