जामखेड शहरातील महामार्गावरील अतिक्रमणावर कारवाईचा इशारा.

- Advertisement -spot_img

जामखेड शहरातील महामार्गावरील अतिक्रमणावर कारवाईचा इशारा,

आठ दिवसांत आतिक्रमणे स्वतहा काढुन घ्या आन्यथा खर्च वसूल करणार..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D वरील अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेत संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, पाथर्डी यांच्या कार्यालयामार्फत ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

खर्डा चौक ते बीड कॉर्नर दरम्यान महामार्गालगत करण्यात आलेल्या अवैध बांधकामे व अतिक्रमणांवर ही कारवाई केंद्रित आहे. शुक्रवार, दि. २४ एप्रिल २०२६ रोजी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत जामखेड पंचायत समितीत महामार्ग विभाग, भूमी अभिलेख, नगर परिषद व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

यापूर्वी दि. १ व २ एप्रिल २०२६ रोजी संबंधित सर्व विभागांच्या संयुक्त मोजणीत समर्थ हाॅस्पीटल ते बीड रोड काॅर्नर ते खर्डा चौक या भागात महामार्गाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरच प्रशासनाने नोटिसा देण्याची कारवाई हाती घेतली आहे.

नोटिसनुसार, संबंधित अतिक्रमणधारकांनी ८ दिवसांच्या आत स्वतःहून अतिक्रमण काढून टाकावे, अन्यथा प्रशासनाकडून संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमण हटवले जाईल. तसेच, त्या कारवाईचा संपूर्ण खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

महामार्गाचे रुंदीकरण व इतर विकासकामे सुरळीत पार पाडण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई हवी!
जामखेडमधील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याचा प्रशासनाचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र ही कारवाई सर्व ठिकाणी समान व निष्पक्ष पद्धतीने झाली पाहिजे. दि. १ व २ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या संयुक्त मोजणीत समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नर या भागात महामार्गाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
म्हणूनच प्रशासनाने निवडक कारवाई न करता या भागातील अतिक्रमणांवरही तातडीने कठोर कारवाई करावी. अन्यथा नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अवधूत पवार (सामाजिक कार्यकर्ते)

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा