जामखेड शहरातील सोळा कामांसाठी आडीच कोटींचा निधी मंजूर..
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते राजेंद्र कोठारी यांच्या हस्ते भुमिपुजन..
जामखेड प्रतिनिधी
विकास कामे करतांना गटबाजी न करता शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी हातात हात घालून काम करावे असे व्यक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी व्यक्त केले आहे
दि ११ मार्च रोजी जामखेड शहरातील तपनेश्वर येथील हनुमान मंदिरास आ रोहित पवार यांच्या माध्यमातून नगरविकास खात्या मार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत जामखेड शहरासाठी सोळा कामे मंजूर करण्यात आली असून यासाठी आडीच कोटी चा निधी उपलब्ध करून दिला आहे

यामध्ये तपनेश्वर येथील हनुमान मंदिराला पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे यातून सभामंडप उभारण्यात येणार आहे याचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी नगरसेवक राजेंद्र गोरे माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात सामाजिक कार्यकर्ते पाडुरंग माने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात युवक शहराध्यक्ष वसीम सय्यद शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण ढेपे नगरसेवक माजीद कुरेशी संजय काशीद मोहन पवार ईस्साईल सय्यद बिभीषण धनवडे मंदिर समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार कुकरेजा उपाध्यक्ष बाळासाहेब वाघ सचिव कल्याण घायाळ सदस्य योगीता देशमुख बंडू परदेशी गणेश मासाळ सेंच्युरी चे संचालक शिवाजी काळदाते सचिन देशमुख माजी सरपंच बाबासाहेब देशमाने रोहित पवार यांचे स्विय सहायक सचिन मोकाशी व सोमनाथ मैड हरिभाऊ आजबे मनोज भोरे महारुद्र खैरे हभप संतोष बारगजे चितळे मामा सचिन शिंदे बजरंग डुचे अनिल अडाले समिर काझी जगन्नाथ धर्माधिकारी विजय क्षिरसागर दिपक घायतडक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कोठारी म्हणाले की दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे जामखेड शहरातील मंदिर मस्जिद स्मशानभूमी यासाठी निधी उपलब्ध झाला आहे जामखेड शहर नंदनवन करण्यासाठी आ रोहित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे जनतेने जे नगरसेवक निवडून दिलेले आहेत याचा विचार करून सत्ताधारी असो की विरोधी असो याचा विचार न करता सर्व नगरसेवकांना विकासासाठी समान निधी द्यावा कुठलाही भेदभाव करू नये

तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास माने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी निधी साठी प्रयत्न करावे या मंदीरासाठी सुरुवातीला मी स्वतःमदत केली आहे भविष्यातही आ रोहित पवार यांच्या माध्यमातून निधी साठी प्रयत्न करू असे आश्वासन कोठारी यांनी दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मासाळ तर आभार योगिता देशमुख यांनी मानले

चौकट
नगरसेवक राजेंद्र गोरे यांनी आ रोहित पवार यांच्या कडे सतत पाठपुरावा करून हनुमान मंदिर व तपनेश्वर महादेव मंदिर विंचरणा नदीच्या काठी यासाठी निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले आहे भविष्यात ही ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सतत संघर्ष करत राहू असे सांगितले आहे



