जामखेड शहरात झाला गोळीबार, घटनेने शहर हादरले..

- Advertisement -spot_img

जामखेड शहरात झाला गोळीबार,
घटनेने शहर हादरले..

सागर मोहळकरवर गोळीबार तीन ते चार गोळ्या झाडल्या गेल्या..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा आसलेल्या सागर मोहळकर याच्यावर शहरातील नुरानी कॉलनी रस्ता या ठिकाणी मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी जवळ जात तीन ते चार गोळ्या झाडल्या. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र शहरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की बुधवार दि ४ मार्च रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सागर मोहळकर हा शहरातील नुरानी कॉलनी रोड येथुन पायी चालला होता. यावेळी हल्लेखोर मोटारसायकलवरून आल्याचे समजते अज्ञातांनी सागर मोहळकर याच्या जवळ जाऊन त्याच्यावर ३-४ गोळ्या झाडल्या. यामध्ये सागर मोहळकर हा गंभीर जखमी झाला होता. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी गर्दी जमली होती. यानंतर घटस्थळी पोलिस आल्यावर स्थानिक नागरीकांच्या मदतीने त्याला प्राथमिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या अभंगांमध्ये तीन ते चार गोळ्या असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

सागर मोहळकर गून्हेगारी प्रवृत्तीचा होता. दोन दिवसांपूर्वी त्याच्या वडीलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्याची गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालले होती. जामखेड पोलीस स्टेशनसह विविध ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आला आहे. कुख्यात गुंड सागर मोहळकर यास जामखेड पोलीसांनी एक वर्षांसाठी हद्दपार देखील केले होते. यानंतर तो जामखेडला आल्यावर शहरासह तालुक्यात रोजच्या रोज त्याच्या त्रासदायक कृत्य वाढत चालले होते. मात्र त्याच्याविरुद्ध कोणीही तक्रार दाखल करण्यास पुढे येत नव्हते.

सागर मोहळकर याच्यावर गोळीबार कोणी व का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या आरोपी हे फरार आसुन सारग मोहळकरवर जामखेडमध्ये प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर या ठिकाणी हलवण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा