जामखेड शहरात महावीर जयंती उत्साहात साजरी

- Advertisement -spot_img

जामखेड शहरात महावीर जयंती उत्साहात साजरी.

‘प्रेम से बोलो, जय महावीर’च्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.

जामखेड प्रतिनिधी
अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि ‘जगा व जगू द्या’चा संदेश देत मानवतेचा मार्ग उजळून टाकणारे जैन धर्मातील २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज मंगळवारी दि. ३१ मार्च २०२६ रोजी जामखेड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

‘प्रेम से बोलो, जय महावीर’च्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व सकल जैन समाजाच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ८ वाजता भगवान महावीर यांच्या प्रतिमेची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. बिड रोड, छत्रपती चौक, जयहिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ मार्गे निघालेल्या या मिरवणुकीची सांगता जैन स्थानक येथे झाली.

मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत करत जयघोष केला.मिरवणुकीदरम्यान जैन बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची व शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती. अमृत पशुखाद्य व अशा भेळ येथे रोटरी क्लब ऑफ जामखेड शहरच्या पदाधिकाऱ्यांनी ही व्यवस्था केली. तसेच तेजस बेकर्स येथेही पाण्याच्या बाटल्या व शीतपेयांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच पदाधिकारी, संचालक मंडळ, ट्रस्टी व श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
रोटरी क्लब ऑफ जामखेड शहर यांच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या उपस्थित पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सादेख पठाण, उपाध्यक्ष प्रफुल सोळंकी, सचिव अरुण उगले, सल्लागार डॉ. प्रशांत गायकवाड, प्रचार प्रमुख धनराज पवार, पत्रकार किरण रेडे यांच्या सह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच मिरवणुकीदरम्यान जैन बांधवांसाठी रोटरी क्लब यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा