जामखेड नगरपरिषदेच्या वतीने हळदीकुंकू व तिळगूळ कार्यक्रमाचे आयोजन..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या संकल्पनेतून परिषदेचे कर्मचारी व सफाई कामगार महिलांसाठी हळदीकुंकू व तिळगुळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की
नविन वर्षाचा पहिला सण संक्रात आहे नगरपरिषदेत या सणासह सर्व सण उत्सव महापुरुषांच्या जयंती अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा आमचा मानस आहे आपले शहर स्वच्छ सुंदर राहाण्यासाठी व शहरातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी सर्व कर्मचारी हे काम करत आसतात पदाधिकारी व कर्मचारी हे आपल्या परिषदेचे प्रमुख घटक आहेत त्यामुळे आपण एक कुटुंब म्हणून पुढील काळात शहराच्या विकासासाठी काम करू आणी सण उत्सवही पालिकेमध्ये साजरे करू
आसे सांगितले

यावेळी उपनगराध्यक्ष पोपट(नाना) राळेभात नगरसेविका सुमन शेळके सिमा कुलकर्णी नंदा होळकर वैशाली म्हेत्रे अशाबाई टकले जया गव्हाळे गटनेते तात्याराम पोकळे अमित चिंतामणी नगरसेवक श्रीराम डोके प्रविण सानप विकी घायतडक संजय काशिद मोहन पवार हर्षद काळे प्रविण चोरडीया पवन राळेभात गणेश डोंगरे यांच्यासह संतोष गव्हाळे अर्जुन म्हेत्रे सागर टकले प्रविण होळकर व नगरपरिषदेचे अधिकारी सर्व कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपनगराध्यक्ष पोपट राळेभात यांनी केले सुत्रसंचलन विकी घायतडक तर आभार अमित चिंतामणी यांनी मानले तसेच विभाग प्रमुखांनी देखील आपल्या संस्कृतीतील मकर संक्रांतीच महत्व मनोगतातून व्यक केले.



