जामखेडमध्ये ‘जागर लोकशाहीचा’ उपक्रम..
जिव्हाळा फाउंडेशनचा सामाजिक ऐक्यासाठी पुढाकार..
जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरात प्रथमच आगळावेगळ्या आणि नाविन्यपूर्ण अशा ‘जागर लोकशाहीचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने आयोजित या उपक्रमाचा उद्देश सध्याच्या सामाजिक परिस्थितीत समाजात बंधुभाव प्रस्थापित करणे तसेच सामाजिक सलोखा,देशप्रेम आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करणे हा आहे.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत कार्यरत समाजसेवकांना एकत्र आणून लोकशाहीचा जागर घडविणे, सामाजिक नीतिमत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना आणि अनिष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी काय केले पाहिजे यावर चिंतन करण्यात येणार आहे.अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व शहाजी डोके सर यांच्या ७५व्या वर्षानिमित्त हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योगपती रमेशजी गुगळे तर अध्यक्षस्थानी संतोषजी पवार असणार आहेत.हा कार्यक्रम मंगळवार दिनांक २४/२/२०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता केशर हॉल खर्डा रोड जामखेड येथे होणार असून, समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.



