डॉ.सादेख पठाण यांची जामखेड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड.

- Advertisement -spot_img

डॉ.सादेख पठाण यांची जामखेड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड.

उपाध्यक्षपदी प्रफुल सोळंकी, सचिवपदी अरुण उगले,तर कोषाध्यक्षपदी विकास पवळ यांची निवड..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सादेख जानमोहम्मद पठाण यांची रोटरी क्लब ऑफ जामखेडच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रफुल सोळंकी, सचिवपदी अरुण उगले, कोषाध्यक्षपदी विकास पवळ यांची निवड झाली आहे.

सल्लागार म्हणून डॉ. प्रशांत गायकवाड, इव्हेंट मॅनेजमेंट प्रमुख मयूर भोसले, प्रसिद्धी प्रमुख धनराज पवार, आरोग्य व महिला प्रतिनिधी डॉ. विद्या तोंडे यांच्यासह कार्यकारी सभासद म्हणून डॉ. सुशिल पन्हाळकर, डॉ. विकी दळवी, संभाजी मुळे व विजय पवार यांचीही निवड झाली आहे. डॉ. पठाण यांचा जन्म सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला असून त्यांचे बालपण नाळवंडी व डोंगरकिन्ही या ग्रामीण भागात गेले.

त्यामुळे तळागाळातील नागरिकांशी त्यांची घट्ट नाळ जुळली आहे. वैद्यकीय सेवेतून गरजू रुग्णांना मदत करण्याची त्यांची जाणीव सातत्याने दिसून येते. सन २००९ पासून त्यांनी जामखेड येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. कोविड काळात त्यांनी अनेक रुग्णांना माफक दरात व काहींना मोफत उपचार देत महत्त्वाची सेवा बजावली. तसेच रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून देणे, निराधार मृतांच्या अंत्यविधीसाठी स्वखर्चाने मदत करणे अशा विविध उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाज जागृतीपर लेखनातूनही ते सक्रिय आहेत.

सन २०१९ पासून ते जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात संस्थेला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या एकूण कार्याचा गौरव म्हणून २०२६-२७ या वर्षासाठी त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा