तरुण पिढीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या भविष्याची वाटचाल करावी:अकाश बाफना

- Advertisement -spot_img

जामखेडमध्ये शिवसेनेकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात शिवसेनेच्या वतीने विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडले.
सदाफुले वस्ती येथील आंबेडकर ब्लॉकमध्ये शिवसेना युवा नेते आकाश शेठ बाफना यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना आकाश बाफना म्हणाले की, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य माणसाला यशाचे शिखर गाठण्याची दिशा दिली. त्यांच्या विचारांमुळे समाजातील प्रत्येक घटकाला आत्मविश्वास मिळाला. आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या भविष्याची वाटचाल करावी.

ते पुढे म्हणाले की, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा संदेश आजही तितकाच जिवंत आणि प्रेरणादायी आहे. शिक्षण हेच खरे शस्त्र असल्याची जाणीव करून देत त्यांनी समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले.

या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने, आंबेडकर चळवळीचे नेते विकी भाऊ सदाफुले, सोनू सदाफुले, दीपक सदाफुले, अमोल सदाफुले, अजय अवसरे, सुनील जावळे, अभिमान गायकवाड, सुहास आव्हाड, गणेश लुंकड, विकी पिंपळे तसेच इतर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामखेड शहरात विविध भागांमध्ये अशाच पद्धतीने अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करून महामानव डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा