दहीगाव योजनेला सभापती प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून मिळाली आहे गती..

- Advertisement -spot_img

जामखेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध :श्रीराम डोके सभापती पाणीपुरवठा…

दहीगाव योजनेला सभापती प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून मिळाली आहे गती..

जामखेड प्रतिनिधी
दहीगाव जामखेड पाणीपुरवठा योजनेची नगरपरिषदेकडून नुकतीच स्थळपहाणी करण्यात आली नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी उपनगराध्यक्ष पोपटनाना राळेभात मुख्याधिकारी अजय साळवे तसेच नगरसेवक यांच्यासह संबधीत विभागाचे अधिकारी हे उपस्थित होते.

दरम्यान ज्या आडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला आसुन दर आठ दिवसांनी योजनेच्या कामासंदर्भात मिटिंग घेण्यात येणार आहे त्या बाबत सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे पाठपुरवठा करणार
त्यामुळे या योजनेला सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून गती मिळेल आणी लवकरच जामखेडकरांना उजनीचे पाणी मिळेल असा विश्वास जामखेड नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती श्रीराम डोके यांनी व्यक्त केला आहे

तसेच सध्यास्थित भुतवडा तलावातून जामखेड शहराला पाणीपुरवठा होत आहे परंतु वाढत आसलेल्या शहराचा विस्तार पहाता पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही तलावात पाणी साठा उपलब्ध आहे परंतु पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची क्षमता कमी आसल्या कारणाने आठ ते दहा दिवसांनी पाणी पुरवठा करावा लागत आहे मध्यंतरी काही ठिकाणी अस्वच्छ पाणी पुरवठा होत आसल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या

त्यानुसार आता पाणी फिल्टरमधील त्रुटी दुरूस्त केल्या आसुन पाण्याचा टी.डी.एस चेक करून शुध्द व सुरळीत पाणीपुरवठा शहराला सुरू आसुन जामखेड नगरपरिषद रोटेशन नुसार सर्व शहरात पाणी पुरवठा करत आहे

आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे पाण्याचा जास्त प्रमाणात वापर होत आसतो तरी शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे त्यामुळे पाणी जपुन वापरावे ही टंचाई थोडे दिवसच जाणवणार आहे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून जामखेडकरांना लवकरात लवकर दहीगाव योजनेतून जामखेड शहर व उपनगरांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा होणार आसल्याचे जामखेड नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती
श्रीराम डोके यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे

तसेच पाणी पुरवठ्याबाबत नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी उपनगराध्यक्ष पोपट राळेभात सर्व नगरसेवक व नगरपरिषद प्रशासान कटीबध्द आसल्याचे सांगितले..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा