(दिशा) समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी अंजली लक्ष्मण ढेपे यांची निवड ..

- Advertisement -spot_img

जिल्हा विकास समन्वय समिती (दिशा) समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी अंजली लक्ष्मण ढेपे यांची निवड ..

खासदार निलेश लंके यांनी सत्कार करून दिल्या अंजली ढेपे यांना शुभेच्छा..

जामखेड प्रतिनिधी
गेली अनेक वर्षांपासून जामखेडच्या सामाजिक. शैक्षणिक, राजकीय व क्रीडा क्षेत्राच्या विविध पदांच्या माध्यमातून तसेच विविध शासकीय समितीच्या माध्यमातून महिलांसाठी काम करत असलेल्या महारूळी गावच्या माजी सरपंच अंजली लक्ष्मण ढेपे यांची शासनाच्या जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वय समिती (दिशा) या समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड करण्यात आली असून समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.

या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
ही समिती केंद्रशासन व राज्य शासनाच्या योजना राबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करत असते. या समितीचे अध्यक्ष हे शिर्डी मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सहअध्यक्ष नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके हे आहेत. तर सचिव म्हणून जिल्हाधिकारी हे काम पाहत असतात. या समितीत सर्व प्रमुख खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असतो.

या समितीचे सहअध्यक्ष तथा नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीनुसार अंजली ढेपे यांची या समितीवर निवड करण्यात आली आहे.श्रीमती अंजली ढेपे यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या माजी तालुकाध्यक्ष, महारूळी गावच्या माजी सरपंच म्हणून काम केले असून सध्या त्या दक्षता समितीच्या तालुकाध्यक्ष, महिला समुपदेशन केंद्राच्या अध्यक्षा, तालुका विधि समितीच्या सदस्या व जामखेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सचिव अश्या पदांवर काम करत आहेत.

या पदांच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेत अहिल्यानगर दक्षिण मतदार संघाचे खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे.
या निवडी बद्दल खासदार निलेश लंके व आमदार रोहित पवार यांच्यासह विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा