नगरसेवक पवन राळेभात यांच्यावतीने करण्यात आला सन्मान

- Advertisement -spot_img

अश्विनी कदम UGC NET परिक्षा उत्तीर्ण..

नगरसेवक पवन राळेभात यांच्यावतीने करण्यात आला सन्मान..

जामखेड प्रतिनिधी

धोत्री (ता. जामखेड) येथील सौ. अश्विनी सतिश कदम यांनी UGC NET परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी ही परीक्षा प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द व कठोर परिश्रम यांच्या जोरावर सौ.अश्विनी सतिश कदम यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या यशामागे त्यांचे पती श्री सतिश कदम तसेच प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांचे प्रोत्साहन व गुरुजनांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
या निमित्ताने जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक श्री पवन राळेभात यांनी सपत्नीक त्यांचे घरी भेट देऊन अभिनंदन केले तसेच मित्रपरिवार, गावातील नागरिक, व नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना अश्विनी कदम म्हणाल्या की मला भविष्यात उच्च शिक्षण क्षेत्रात कार्य करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्व पटवुन देयाचे आहे आज समाजात बारावीनंतर बऱ्याच मुलींचे शिक्षण थांबत आहे त्यामुळे उच्च शिक्षणासाठी मुलींनी पालकांकडे आग्रह धरला पाहिजे आसे बोलताना सांगितले..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा