ना. भा. तांबे ज्युनिअर कॉलेजच्या
उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
या कॉलेजचे उपक्रमशील शिक्षण ठरतेय यशाचे गमक.
जामखेड प्रतिनिधी
दि. २ मे रोजी जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालात ना. भा. तांबे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि एच.एस.सी. व्होकेशनलने शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखत शैक्षणिक क्षेत्रात आपली भक्कम छाप पुन्हा एकदा उमटवली आहे.

केवळ निकालापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या या महाविद्यालयाने उपक्रमशीलतेच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

महाविद्यालयात नियमित अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. मार्गदर्शन वर्ग, सराव परीक्षा, शंका निरसन सत्रे, करिअर मार्गदर्शन कार्यशाळा तसेच व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. शिक्षकवर्गाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, वैयक्तिक लक्ष आणि पालकांशी समन्वय यामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत असून याचाच परिणाम निकालात दिसून येत आहे.

यंदाच्या निकालात विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. विज्ञान शाखेत संस्कृती तुकाराम निंभोरे हिने ९२.१७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रगती संतोष देठे (९०.००%) व प्रतिक विजय समिंदर (८९.३१%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेत मोनिका नारायण जगताप (७५.५०%) प्रथम, शौर्य मनोज निकम (७४.८३%) द्वितीय आणि तेजस सुधीर पाडोळे (६९.८३%) तृतीय ठरले. वाणिज्य शाखेत सौरभ भैरु चव्हाण (६६.५०%) प्रथम, आकाश दादासाहेब गायकवाड (६०.३३%) द्वितीय आणि आदित्य योगेश गाडेकर (६०.००%) तृतीय आले.
एच एस सी हो व्होकेशनल
आदेश बाळकृष्ण सुतार -71.83
ओंकार राजेंद्र सोनटक्के-58.17
महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावरही लक्ष केंद्रित केले जाते. एच.एस.सी. व्होकेशनल शाखेद्वारे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यात येत असून प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून त्यांची तयारी घडवली जाते.

यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासोबतच करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. ओंकार तांबे, प्रा. प्रकाश तांबे तसेच प्राचार्य घुमरे सर यांनी समाधान व्यक्त केले. “विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जोड आणि पालकांचा विश्वास या त्रिसूत्रीमुळेच हा शंभर टक्के निकाल शक्य झाला आहे. पुढील काळातही गुणवत्तापूर्ण व उपक्रमशील शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील,” असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण कार्यामुळे जामखेड परिसरात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.



