जामखेड नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा : मालमत्ता कर विभाग नगरपरिषद जामखेड.
पन्नास टक्के शास्ती माफी अभय योजनेचा आजचा शेवटचा दिवस.

जामखेड प्रतिनिधी
शासनाच्या वतीने नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना करामध्ये दिलासा मिळावा यासाठी अभय योजना म्हणजे शास्तीमध्ये पन्नास टक्के सुट अशी योजना सुरू आसुन या योजनेचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे नागरिकांनी आजच आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड नगरपरिषद मालमत्ता कर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे..

महाराष्ट्र शासनाच्या वतीने शास्ती च्या व्याजामध्ये जिल्हाधिकारी यांनी 50 टक्के शास्ती माफ केली आहे त्यामुळे नागरिकांनीही आजपर्यंत त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे आजच्या दिवशी कर भरून नगरपरिषदेला सहकार्य करावे असे अवहान नगरपरिषदकडुन करण्यात आले आहे

जामखेड शहरातील विविध विकास कामे नगरपरिषदेच्या करातून केली जातात तसेच संपूर्ण नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना या करा मधून पगार दिले जातात त्यामुळे जामखेड शहराच्या विकासासाठी आपली घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे

आज रोजी महावीर जयंतीच्या निमित्ताने सुट्टी आसली तरी नगरपरिषद कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी आज सायंकाळपर्यंत आपला कर भरणा करावा..


