पन्हाळाकर हॉस्पिटलच्या वतीने धनेगाव येथिल धाकटी पंढरीत भाविकांना फराळाचे वाटप.
जामखेड प्रतिनिधी
“बोलावा विठ्ठल… पाहावा विठ्ठल… करावा विठ्ठल जीवेभावे…” या संतवाणीने दुमदुमलेल्या वातावरणात, टाळ-मृदंगाच्या निनादात, हरिनामाच्या अखंड गजरात आणि वारकऱ्यांच्या भक्तिभावाने धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे यंदाचा आषाढी एकादशी महोत्सव अत्यंत भक्तिमय, भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण धनेगाव परिसर भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघाला. शनिवारी (दि. २५) पहाटेपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली, विषेश म्हणजे आनेक पायी दिंड्यांच्या आगमनाने संपूर्ण धनेगाव येथिल धाकटी पंढरी ही वारकरी संप्रदायाच्या भक्तिरंगात रंगून गेली होती.

आनेक भागातुन दिंड्या या ठिकाणी आल्यावर टाळ, मृदंग, वीणा, हरिपाठ आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला. वारकरी महिला व पुरुषांनी पारंपरिक फुगड्या खेळत विठ्ठल नामाचा अखंड गजर केला. टाळ-मृदंगाच्या तालावर रंगलेल्या या फुगड्यांनी उपस्थित भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

याच आनुशंगाने जामखेड येथील सामाजिक क्षेत्रातील नेहमीच सक्रिय असलेले पन्हाळकर हाॅस्पीटल चे संचालक डॉ. सुशिल पन्हाळकर यांच्या कडुन धनेगाव येथे येणाऱ्या भाविक भक्तांना फराळ वाटप करण्यात आला. या फराळाचा मोठ्या प्रमाणात भाविकांनी देखील लाभ घेतला. धनेगाव येथिल धाकटी पंढरीत भाविकांना फराळ वाटपाचा यावर्षीचे दुसरे वर्ष आहे. फराळ वाटप कार्यक्रमा दरम्यान पन्हाळकर हाॅस्पीटल चे डॉ सुशिल पन्हाळकर यांच्या मातोश्री सुरेखा विष्णुपंत पान्हाळकर, अतुल कडू, शुभम महादेव पोकळे, तुकाराम भोरे, अनी चव्हाण, विनोद डोके यांनी खास परीश्रम घेतले.

या आषाढी एकादशीच्या उत्सवासाठी घनेगाव ग्रामस्थ व ट्रस्टी दोन दिवस नवरात्र झटून भाविक भक्तांना सेवा पुरवण्याचे काम करतात, तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक धाकटी पंढरी येथे येणाऱ्या दिंड्या व भाविक भक्तांच्या स्वागतासाठी मुस्लिम बांधवही उपस्थित असतात. याठिकाणी दिवसभर भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.



