परशुराम प्रतिष्ठान मार्फत जामखेड शहरात सामुदायिक व्रतबंध..

- Advertisement -spot_img

परशुराम प्रतिष्ठान मार्फत जामखेड शहरात सामुदायिक व्रतबंध..

पाल्यावर योग्य वयात धार्मिक संस्कार व्हावेत या उद्देशाने करण्यात आले आयोजन..

जामखेड प्रतिनिधी

परशुराम प्रतिष्ठानतर्फे जामखेड येथील राज मंगल कार्यालयात सामुदायिक व्रतबंध कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यामध्ये एकूण ७ बटूंचे उपनयन संस्कार अर्थात व्रतबंध पार पडले.या सोहळ्यासाठी परशुराम प्रतिष्ठान मार्फत गेली दोन महिने सर्व सदस्य नियोजन करत होते. सर्व समाजाला एकत्र घेऊन व सर्व समाजाच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत देखण्या रूपात व वैदिक पद्धतीने पार पडला.

हा सोहळा पार पडत असताना संस्थेमार्फत केलेले योग्य नियोजन, योग्य टाइमिंग, संस्थेच्या सदस्यांची शिस्त, प्रत्येक गोष्टीची योग्य निवड, या गोष्टी कौतुकास्पद होत्या. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सोहळा होत असताना हा सार्वजनिक सोहळा आहे असे जाणवत नव्हते. सकाळी बरोबर सात वाजता धार्मिक विधीला सुरुवात होऊन दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व धार्मिक विधी पार पडले. समाजातील ज्यांनी हा कार्यक्रम पार पडण्यासाठी आपले योगदान दिले या सर्वांचा संस्थेच्या वतीने भगवान परशुराम यांची फ्रेम व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पाल्यावर योग्य वयात धार्मिक संस्कार व्हावेत परंतु वेळ,आर्थिक परिस्थिती,व मनुष्यबळाची कमतरता या कारणांमुळे योग्य वयात पाल्याचा व्रतबंध सोहळा करणे खुप अवघड झालेले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता परशुराम प्रतिष्ठान या संस्थेने सामाजिक बाधिलकी जपत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने आपले कर्तव्य समजून सामुदायिक व्रतबंध सोहळा आयोजित केलेला होता. अशाप्रकारचे सामुदायिक उपक्रम होणे ही काळाची गरज आहे. समाजसेवा म्हणजे एक प्रकारे राष्ट्रसेवाच आहे त्यामुळे समाजात एकोपा निर्माण होतो, विचारांची देवाण-घेवाण होते, गरजू व्यक्तींना एक संधी किंवा त्यांचा आर्थिक भार कमी होतो

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा