पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली

- Advertisement -spot_img

जामखेड नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना केले जाहीर आवाहन..

पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू:मुख्याधिकारी अजय साळवे..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा आज बंद रहाणार आहे याबाबत जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी जामखेडकरांना पाणीपुरवठ्या संदर्भात जाहीर आवहान केले आहे आणी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू आसुन लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल असे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले आहे.

जामखेड शहरातील सर्व सन्माननीय नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, शहराला पाणीपुरवठा करणारी भुतवडा तलावावरून येणारी मुख्य पाईपलाईन आज दिनांक 15 मार्च 2026 रोजी पहाटे 2.00 च्या सुमारास एका शेतकऱ्याकडून खासगी खोदकामादरम्यान अचानक फुटली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे तलावावरून होणारा पाणी उपसा तातडीने बंद करावा लागला आहे. मुख्य वाहिनी फुटल्यामुळे शहरातील पाणी साठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरू शकल्या नाहीत. परिणामी, आज रविवार, दिनांक:-15/03/2026 रोजी शहराच्या विविध भागात होणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

नगरपरिषदेमार्फत पाईप लाईन दुरुस्तीचे काम सुरु केलेले असून सदर काम लवकरात लवकर पूर्ण करून आज होणाऱ्या भागातील पाणी पुरवठा उद्यापासून (सोमवार), दिनांका:- 16/03/2026 पासून नियमित वेळेनुसार सुरळीत करण्यात येईल.

अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, त्याबद्दल नगरपरिषद प्रशासन दिलगीर आहे. तरी सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा आणि नगरपरिषदेस सहकार्य करावे.
आसे अवहान करण्यात आले आहे..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा