महंत विठ्ठल महाराज यांच्या किर्तनाने वामनभाऊ गड जमदारवाडी च्या सप्ताहाची सांगता.

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी
संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत वामनभाऊ महाराज गड जमादारवाडी येथील गेली सात दिवसांपासून सुरू भव्य आखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

चुराचुराकर माखण खाया! गौळण का नंद कुमर कन्हैया!! जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गौळण प्रकरणावर चिंतन मांडले. पुढे बोलताना महाराज म्हणाले की काला म्हणजे आपला जन्म आपण जन्माला येऊन काय मिळवले व स्वहितासाठी काय केले हाच काला आहे,संत वामनभाऊ महाराजांसह सर्व संतांची किर्ती आजही समाजात वाढत आहे त्यासाठी त्यांनी समाजाच्या उध्दारासाठी आपले जिवन व्यतीत केले आहे.

यावेळी प्रा. मधुकर(आबा) राळेभात, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, अमित चिंतामणी नगरसेवक संजय काशीद,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते शहाजी राळेभात, लक्ष्मण ढेपे सर अमोल गिरमे , उपस्थित होते.

यावेळी सात दिवस येथे विविध कीर्तनकार यांची कीर्तनाची सेवा झाली. सात दिवस रोज किर्तन सेवेनंतर मोठ्या प्रमाणात अन्नदान झाले. पहाटे काकडा विष्णुसहस्रनाम ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन व दुपारी तीन ते पाच या वेळेत श्री संत वामनभाऊ महाराज यांचे चरित्र.

संत वामनभाऊ गड सर्व जाती धर्मातील लोकांसाठी लोकांचे श्रद्धास्थान बनले आहे हे जामखेडचे वैभव बनले आहे असे प्रतिपादन यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी केले संत वामनभाऊ महाराज यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी मी आले मी या परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न करील. असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी केले.

धार्मिक कार्यक्रमाबरोबरच गडवर राबिला सामाजिक उपक्रम
तीस रक्तदात्यांनी केले रक्तदान भाऊंनी समाजासाठी कार्य करा गरजुवंताना साह्यता करा ही शिकवण दिली आहे याच आनुशंगाने साई सेवा रक्तपेढी व संत वामनभाऊ महाराज गड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यासाठी डॉ. रुपाली बांगर अजित जगताप पायल वैद्य निकीता मोरे रोहिणी टेंभुरकर पियुष पाटील यांचे सहकार्य लाभले यावेळी ग्रामस्थांनी तसेच विविध तरुण मंडळांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा