महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे नगरपरिषदेच्या वतीने आयोजन
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी मजबूत संविधान दिले:नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी
जामखेड प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जामखेड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले

जामखेड नगरपरिषदेच्या वतीने खर्डा चौक येथे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात तहसीलदार धनंजय बांगर व नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर बौद्धाचार्य अशोक अव्हाड यांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून बाबासाहेबांना अभिवादन केले.

यावेळी बोलताना तहसीलदार धनंजय बांगर म्हणाले की,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व दिले आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या पुढील पिढ्यांना शिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे.

नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
बाबासाहेबांनी भारताला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे मजबूत संविधान दिले असून, ते प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक ठरत आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले की,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दर्जा व संधीची समानता प्रस्थापित करणारा समाज घडवण्याचे स्वप्न पाहिले. त्या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्ण समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमास तहसीलदार धनंजय बांगर, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात,अमित भाऊ चिंतामणी, नगरसेविका नंदाताई होळकर, सिमाताई कुलकर्णी, संगीता ताई भालेराव, जया ताई गव्हाळे, अरुण आबा जाधव, प्रा. कैलास माने, तात्याराम पोकळे, संजय काका काशीद, अशोक शेळके, मोहन पवार, प्रवीण सानप संतोष गव्हाळे, सागर टकले, मनोज कुलकर्णी, प्रा. विकी घायतडक, प्रवीण शेठ चोरडिया, अर्जुन म्हेत्रे, वसीम सय्यद, इस्माईल सय्यद, राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, दिगंबर चव्हाण, मुख्याधिकारी अजय साळवे, संध्याताई सोनवणे, सुरेखा सदाफुले यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी व भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच जामखेड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत महामानवांना अभिवादन केले.


