महिला दिनानिमित्त जनविकास सेवाभावी संस्थेचा उपक्रम

- Advertisement -spot_img

शोषित वंचित घटकातील महिलांना वंदनाताई कसारे यांनी न्याय मिळवून दिलेला आहे :लक्ष्मीताई ताई पवार

जागतिक महिला दिनानिमित्त जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने वंदनाताई कसारे यांचा सन्मान..

जामखेड प्रतिनिधी

यावेळी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीताई पवार बोलताना म्हणाल्या की वंदनाताई कसारे यांनी तळागाळातील शोषित पीडित वंचित घटकातील महिलांसाठी मोठे कार्य केलेले आहे

त्यामुळे त्यांच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय मिळालेला आहे किशोरवयीन मुलींसाठी पंधरा वर्षापासून त्या समुपदेशक म्हणून कार्य करत आहेत सावित्रीबाई फुले एकात्मिक समाज महामंडळ या संस्थेअंतर्गत त्यांच्या प्रयत्नातून 100 बालविवाह थांबलेले आहेत तसेच 700 पेक्षा जास्त मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी आणले आहे

त्याचप्रमाणे किशोर वयातील बदल लैंगिक हिंसाचार या संदर्भात त्यांनी विविध शाळेत सत्र घेऊन जनजागृती केली आहे तसेच त्यांना 2020 चा सबला उत्कर्ष राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे तर
बेटी बचाव बेटी पढाव तसेच 2020 म.टा.सन्मान महिला दिनानिमित्त प्रदान करण्यात आला होता
2024 चा विदर्भ गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले

महाराष्ट्र टाइम्स दिव्य मराठी मध्ये त्यांच्या कार्याचे लेखही प्रसिद्ध झाले आहेत कोरोना काळात दामिनी पथकासोबत मदत कार्य लॉजिक हिंसाचार आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या अनेक केसेस पोलीस प्रशासन व दामिनी पथकाच्या माध्यमातून त्यांनी सोडवलेल्या आहेत त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सन्मान स्विकारला त्याबद्दल धन्यवाद..

सत्काराला उत्तर देताना वंदनाताई कसारे म्हणाल्या की तळागाळातील शोषित वंचित घटकातील महिलांना न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी अविरतपणे सुरू ठेवणार आहे कारण समाजामध्ये आजही महिलांना न्याय मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे तळागळातील समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे त्यांचावर आन्याय झाला तरी ते पुढे येत नाहीत अशा घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी हे कार्य करत रहाणार आहे

मला अनेक पुरस्काराने व सत्काराने
सन्मानित केले आहे त्यामुळेच हे
कार्य करण्यास आणखी उर्जा मिळत राहाते.तसेच लक्ष्मीताई पवार यांचेही सामाजिक कार्य मोठे आहे जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनीही शोषित पीडित वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलेले आहे
असे बोलताना त्यांनी सांगितले यावेळी जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष लक्ष्मीताई पवार निशा पवार सुनिता मोरे रुकसाना पठाण भारतीय जनता पार्टीचे युवा नेते राम पवार बाबासाहेब फुलमाळी राजू शिंदे अश्विन जाधव उपस्थित होते..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा