मिनी अग्नीशमन वाहनामुळे अरुंद रस्त्यांवरील आपत्कालीन सेवांना गती:नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

- Advertisement -spot_img

मिनी अग्नीशमन वाहनामुळे अरुंद रस्त्यांवरील आपत्कालीन सेवांना गती:नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराच्या वाढत्या विस्तारासोबत नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात मिनी फायर रेस्क्यू वाहनाची नव्याने भर पडली आहे.

या वाहनाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी नगरपरिषद परिसरात फीत कापून करण्यात आले.शहरातील अनेक भागांत अरुंद रस्ते आणि दाट वस्ती असल्याने मोठ्या अग्निशमन गाड्यांना वेळेत पोहोचणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर मिनी अग्नीशमन वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार असून, आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की, “शहराच्या विकासाबरोबरच नागरिकांची सुरक्षा ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. हे मिनी अग्नीशमन वाहन जामखेडकरांसाठी सुरक्षेचे कवच ठरेल.”
या वाहनाद्वारे पाणी आणि फोमच्या साहाय्याने आग विझवता येणार असून, आग लागल्यास तत्काळ नियंत्रण मिळवणे शक्य होईल. याशिवाय, घरांची पडझड, पूरस्थिती किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही बचावकार्य करण्यासाठी हे वाहन उपयोगी ठरणार आहे.

मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले की, शहराचा विस्तार झपाट्याने होत असून काही भागांमध्ये अग्निशमन यंत्रणा पोहोचण्यात अडचणी येत होत्या. या वाहनामुळे त्या अडचणी दूर होऊन अग्निशमन विभागाची कार्यक्षमता वाढणार आहे.नगराध्यक्षा चिंतामणी यांनी यावेळी नमूद केले की, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधित विभागाने हे वाहन जामखेड नगरपरिषदेस उपलब्ध करून दिले. याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

नगरसेवक अॅड. प्रविण सानप यांनीही सांगितले की, नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरसेवकांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे वाहन मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कार्यक्रमास गटनेते तात्याराम पोकळे, सभापती श्रीराम डोके, मोहन पवार, अर्जुन म्हेत्रे, प्रविण चोरडिया, मनोज कुलकर्णी, प्रविण होळकर, अशोक शेळके तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

एकूणच, जामखेड शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मिनी अग्नीशमन रेस्क्यू वाहनाची भर ही महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, भविष्यात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ही सुविधा अत्यंत प्रभावी ठरणार आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा