रक्तदान हे श्रेष्ठ दान असून,ते प्रामाणिकपणे व सुरक्षिततेने व्हावे:सभापती प्रा.राम शिंदे

- Advertisement -spot_img

रक्तदान हे श्रेष्ठ दान असून,ते प्रामाणिकपणे व सुरक्षिततेने व्हावे:सभापती प्रा.राम शिंदे

महापुरुषांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने
रक्तदान शिबिराचे आयोजन..

जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव सायं शाखा,जामखेड यांच्या वतीने जैन स्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती तसेच भगवान महावीर जन्मकल्याणक या सर्व महापुरुषांच्या सन्मानार्थ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, समाजकारणातूनच राजकारणाला दिशा मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत’ स्वप्न व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची विचारधारा देशहिताची आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. पुढे त्यांनी सांगितले की, काही ठिकाणी रक्तदान शिबिरांमध्ये आमिष दाखवून फसवणूक होत असून, यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होतो.

अशा शिबिरांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, ते प्रामाणिकपणे व सुरक्षिततेने व्हावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रस्ताविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका तरुण व्यावसायी प्रमुख श्री. वैभव कार्ले यांनी केले. आपल्या प्रस्ताविकामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवाकार्य गेल्या शंभर वर्षांपासून अखंडपणे सुरू असून ते भविष्यातही अविरत सुरू राहील, असे नमूद केले. विविध सेवा कार्यांच्या माध्यमातून संघ स्वयंसेवक गरजूंपर्यंत मदत पोहोचवतात, तसेच ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ असून प्रत्येकाने रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.प्रांजल अमित चिंतामणी, नगरसेविका नंदा होळकर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा बौद्धिक प्रमुख डॉ. प्रशांत शाहणे व उद्योजक श्री.रमेश गुगळे, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, उपाध्यक्ष महावीर बाफना, सेक्रेटरी शरद शिंगवी, आनंद गुगळे, संतोष फिरोदिया,मंगेश बेदमुथ्था तसेच भाजपा व्यापारी शहराध्यक्ष पिंटूशेठ बोरा, उमेश देशमुख,मोहन ढाळे, अमित चिंतामणी, संदीप बोगावत, अशोक बाफना, निखिल बोथरा आदी मान्यवर उपस्थित होते
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रक्तपेढ्यांच्या सहकार्याने संकलित रक्ताचा उपयोग गरजू रुग्णांसाठी होणार असल्याचे सांगण्यात आले व सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व रक्तदाते, मान्यवर व सहकार्य करणाऱ्यांचे सुत्रसंचलन अभय कासवा यांनी केले तर शाखा कार्यवाह अनुराग गुगळे यांनी आभार मानले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा