रेकॉर्ड ब्रेक गर्दी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
जामखेड प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जामखेड शहरातील सदाफुले वस्ती येथे राणा बॉइज मित्र मंडळाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीला नागरिकांनी विक्रमी उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मिरवणुकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सदाफुले वस्ती येथून निघालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख पेठमार्गांवरून मार्गक्रमण करत संविधान स्तंभ येथे दाखल झाली. मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करत मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत केले. विशेष म्हणजे महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लक्षवेधी ठरली.

या मिरवणुकीत विविध सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवत डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संध्या सोनवणे, सलीम बागवान, मनसे नेते सनी सदाफुले, बौद्धाचार्य अशोक आव्हाड, अशोक शेळके, संतोष गव्हाळे, सागर टकले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. विकी घायतडक मित्र मंडळ, स्वप्निल राणा बॉइज मित्र मंडळ तसेच दिपक सदाफुले, अमोल सदाफुले, विशाल अब्दुले, महेंद्र आगे, अजय अवसरे, गौरव सदाफुले, कबीर घायतडक, प्रितम घायतडक, ज्ञानदेव साळवे, प्रशांत पोळ, मुजफ्फर आतार, बाओद्दीन शेख, आकिब आत्तार, शुभम सदाफुले, शुभम घायतडक, सुमित घायतडक, किशोर समुद्र यांनी विशेष परिश्रम घेतले.

जामखेड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती निष्ठा, एकजूट आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.



