रोटरी क्लब ऑफ जामखेड सदस्य पदी प्रफुल सोळंकी यांची निवड.
रोटरी क्लब ही जगभरातील एक प्रमुख स्वयंसेवी संस्था..

जामखेड प्रतिनिधी
आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करित असलेल्या रोटरी क्लब ऑफ जामखेडच्या सदस्यपदी जामखेड येथील सामाजिक क्षेत्रात काम करित आसलेले प्रफुल सोळंकी यांची निवड करण्यात आली. अनेक समाज उपयोगी कार्यामध्ये कायम सक्रिय असलेले प्रफुल सोळंकी यांच्या निवडीचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे.रोटरी क्लब ही जगभरातील एक प्रमुख स्वयंसेवी संस्था आहे, रोटरी क्लबच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात अनेक विकासकामे आणि सेवाभावी उपक्रम राबविले जातात.१५० हून अधिक देशांमध्ये ४५,००० हून अधिक रोटरी क्लब सक्रिय आहेत.

विविध देशांतील सदस्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे आणि जागतिक शांतता राखण्यासाठी प्रयत्न करणे असे अनेक जागतिक देश व स्थानिक पातळीवर कार्य रोटरी मार्फत केले जातात.अनेक समाज उपयोगी कार्यामध्ये कायम सक्रिय असलेले प्रफुल सोळंकी यांच्या निवडीचे स्वागत रोटरी क्लब ऑफ जामखेड अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गायकवाड, सचिव विकास पवळ,कोषाध्यक्ष डॉक्टर सादेख पठाण,उपाध्यक्ष अरुण उगले,डॉ.भरत देवकर, डॉ. सुशील पन्हाळकर, डॉ. विकी दळवी,डॉ.सौ विद्या तोंडे,संभाजी मुळे, आनंद राजगुरू,पत्रकार धनराज पवार यांनी केले.



